Amitabh Bachchan's brother in law and actor Rajeev Varma : भोपाळचे प्रसिद्ध पत्रकार, लेखर आणि कवी तरुण कुमार भादुरी यांच्या मुलगी जया भादुरी यांच्याशी 1973 मध्ये अमिताभ बच्चन यांचं लग्न झालं होतं. त्यावेळी दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे स्टार होते. अनेकांना अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाविषयी माहिती आहे. पण जया भादुरी बच्चन यांच्या कुटुंबाविषयी फारसं माहिती नाही. (maine pyar kiya Salman Papa rajeev verma and amitabh bachchan brother in law jaya bachchan sister rita varma)
जया बच्चन यांना एक रीटा नावाची बहीणही आहे. रीटा यांनाही थिएटरमध्ये रस होता पण त्यांनी कधी या विश्वास पाऊल ठेवलं नाही. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, मैने प्यार कियामधील Salman चे 'पापा' यांची भूमिका साकरणारे अभिनेता यांचा अमिताभ आणि जया बच्चन यांच्याशी खास नातं आहे. राजीव वर्मा अस या अभिनेत्याचं नाव असून तुम्ही यांना अनेक चित्रपटात पाहिलं आहे.
राजीव वर्मा हे रीटा भादुरी यांचे पती आहे. या नात्यानुसार राजीव वर्मा हे जया बच्चन यांचे भाऊजी आहेत तर अमिताभ बच्चन यांचे साडू आहेत. राजीव वर्मा यांनी हम साथ साथ हैं मध्ये तब्बूच्या वडिलांची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे अमिताभ आणि राजीव यांनीही एक चित्रपटात काम केलं आहे. बुड्ढा होगा तेरा बाप आणि आरक्षण या चित्रपटात ते एकत्र दिसले आहेत.
मात्र राजीव यांनी कधीही मेव्हणी जया बच्चन यांच्यासोबत कधीही स्क्रीन शेअर केलेली नाही. राजीव वर्मा यांचा जन्म होशंगाबादमध्ये झाला. भोपाळमध्ये त्यांनी थिएटरमधून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. या थिएटरमध्येच त्यांचं रीट यांच्याशी प्रेम जुळून आलं. 3 वर्षांच्या अफेअरनंतर त्यांनी 1976 मध्ये लग्न केलं. लग्नानतर रीटा यांनी शिक्षिका होण्याचा निर्णय घेतला. सेंट्रल स्कूलमध्ये इंग्रजीच्या त्या प्राध्यापिका झाल्या. रिटा आणि राजीव यांना दोन मुले आहेत.
राजीव वर्मा 'हम दिल दे चुके सनम', 'कोई मिल गया', 'कच्चे धागे', 'हिम्मतवाला', 'चलते चलते' आणि 'क्या कहना' यासह अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. 1987 मध्ये 'चॅलेंज' या टीव्ही शोमधून त्याने आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात केली.