''तुम्ही लग्न कधी करणार?'' फॅननं विचारला प्रश्न, माधूरीचं उत्तर ऐकलंत का? जूना VIDEO व्हायरल

Madhuri Dixit Old Video Speaking With Fans: माधुरी दीक्षितचे फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही अनेक फॅन्स आहेत. ती तिच्या सौंदर्यानं प्रेक्षकांना कायमच घायाळ करत आली आहे. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात ती आपल्या फॅन्सशी संवाद साधता दिसते आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 25, 2023, 07:40 PM IST
 ''तुम्ही लग्न कधी करणार?'' फॅननं विचारला प्रश्न, माधूरीचं उत्तर ऐकलंत का? जूना VIDEO व्हायरल title=
June 25, 2023 | madhuri dixit old video viral where she is speaking with her fans over phone and answers on marriage question (Photo: @madhuri_praiser_vikram | Instagram)

Madhuri Dixit Old Video Speaking With Fans: माधुरी दीक्षित ही आपल्या अभिनयानं कायमच प्रेक्षकांची मनं जिंकून घेते आहे. 90 च्या दशकात अभिनेत्रीनं आपल्या उत्कृष्ट अभिनयानं आणि नृत्यानं तिनं आपल्या प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. आज सोशल मीडियावर ट्रोलिंगचे प्रमाण प्रंचड प्रमाणात हे वाढलं आहे. फॅन्स हे जितके या चाहत्यांवर प्रेम करतात त्याचप्रमाणे ते त्यांना त्यांच्या याव ना त्याव गोष्टींसाठीही ट्रोल होतात. त्यामुळे त्यांच्यावर बरीच टीकाही सहन करावी लागते. यामुळे सेलिब्रेटींची बरीच चर्चाही असते. अशावेळी ट्रोलिंगमुळे सेलिब्रेटी हे स्वत:लाही कायम अलर्ट ठेवतात. पुर्वी मात्र जेव्हा सोशल मीडिया नव्हतं तेव्हा आपल्या आवडत्या कलाकाराला प्रत्यक्षात पाहणं हिच खूप मोठी पर्वणी होती. त्याचसोबत त्यांच्याशी प्रत्यक्ष फोनवर बोलणं किंवा त्यांना पत्र पाठवणं आणि मग त्या पत्राचे उत्तर येणं हेच त्याकाळी फार मोठी फॅन मोमेंट होती. 

आजही कलाकार हे आपल्या त्या फॅन मोमेंटबद्दलही बोलताना दिसतात. सध्या असाच एक माधुरी दीक्षितचा जूना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सध्या सगळीकडेच चर्चा रंगलेली दिसते आहे. यामध्ये माधुरी आपल्या फॅन्सची फोनवर बोलताना दिसते आहे. फोनवरून बोलताना ती आपल्या फॅन्ससोबत हितगुज करताना दिसते आहे. यावेळी तिला पहिला फोन येतो ज्यात तिला एक फॅन विचारते की, मी माधुरी दीक्षितची बोलते आहे का त्यावर ती म्हणते, हो बरोबर. त्यानंतर तिला दुसरा फोन मग तिसरा फोन येतो. अनेक जणं तिला तिच्या आवडीनिवडीबद्दल विचारतात. तिच्या आवडत्या कलाकाराबद्दल विचारतात. त्यावर ती उत्तर देते अमिताभ बच्चन. 

हेही वाचा - गडगंज श्रीमंत युट्यूबरच्या दोन पत्नी रस्त्यावर विकतायत फुलं? व्हायरल फोटोमुळे नेटकरी आश्चर्यचकित

तिच्याशी बोलताना तिचे फॅन्स हे खूप एक्साईडेड होते. आपल्या फॅन्सच्या प्रश्नांना खुद्द माधुरीही अगदी आवडीनं उत्तरं देत होती. या प्रश्नांच्या मध्ये काही फॅन्स तिला विचारतात की तू लग्न कधी करणार त्यावर ती म्हणते की आता मला लग्नात रस नाही आता मला माझ्या करिअरवर जास्त फोकस करायचे आहे. असं उत्तर ती देते. सध्या तिच्या या व्हिडीओनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. या व्हिडीओखालीही नानाविध कमेंट्स येताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका युझरनं कमेंट केली आहे की, लग्नाचा प्रश्न विचारणाऱ्या फॅनला कदाचित कळलं होतं की ती लग्न करून अमेरिकेत जाणार आहे. तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय, वा खूपच सुंदर! हा व्हिडीओ @madhuri_praiser_vikram या युझरनं पोस्ट केला आहे.