'RaanBaazaar ' साठी अभिनेत्रीचं टक्कल, शिव्या देण्याचीही प्रॅक्टिस

तेजस्वी पंडीत आणि प्राजक्ता माळीनंतर माधुरी पवारचं टक्कल.... चर्चेला उधाण   

Updated: May 24, 2022, 05:41 PM IST
'RaanBaazaar ' साठी अभिनेत्रीचं टक्कल, शिव्या देण्याचीही प्रॅक्टिस  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र 'रानबाजार' वेग सीरिजची चर्चा रंगताना दिसत आहे. सीरिजमध्ये  प्रसिद्ध अभिनेत्रींनी बोल्ड भूमिका साकारल्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागला. अभिनेत्री तेजस्वी पंडीत आणि प्राजक्ता माळीनंतर आता सीरिजमध्ये मुख्यमंत्री भूमिकेत झकणारी अभिनेत्री माधुरी पवार तुफान चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर माधुरीच्या टक्कलची जोरदार चर्चा रंगत आहे. 

माधुरी पवार हिनं या सिरीजमध्ये प्रेरणा पाटीलची भूमिका साकारली आहे. या सिरीजमध्ये प्रेरणा पाटीलची भूमिका साकारण्यासाठी माधुरी पवारनं टक्कल केल्याची चर्चा आहे. सध्या सर्वत्र तुच्या लूकची चर्चा रंगत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सीरिजमधील भूमिकेविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली, 'अशी भूमिका मिळणे हे माझ्यासाठी अनपेक्षित होत. पण ती माझ्या वाट्याला दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्यामुळे आली. या भूमिकेसाठी मी खूप मेहनत घेतली.'

ती पुढे म्हणाली, 'अशी भूमिका मिळणे हे माझ्यासाठी अनपेक्षित होत. पण ती माझ्या वाट्याला दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्यामुळे आली. या भूमिकेसाठी मी खूप मेहनत घेतली. राजकीय व्यक्तींना भेटले. त्यांच्या देहबोलीचा भाषेचा आभ्यास केला. '

'राजकारणातील  स्त्रीयांवर आधारित पुस्तक वाचली. इतकेच नव्हे तर शिव्याही शिकले. व्यक्तिरेखेसाठी अक्षरशः शिव्या देण्याचीही प्रॅक्टिस केली. यामुळेच ही भूमिका आज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.' असं देखील माधुरी म्हणाली.