सिद्धार्थ शुक्लाचा शहनाज नाही तर दुसऱ्याच मुलीवर होता जीव...तो व्हिडिओ पाहून चाहत्यांचे डोळेही पाणावले

शहनाज ऐवजी सिद्धार्थच्या आयुष्यात दूसरी आणखीण एक अभिनेत्री असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

Updated: May 20, 2022, 08:11 PM IST
सिद्धार्थ शुक्लाचा शहनाज नाही तर दुसऱ्याच मुलीवर होता जीव...तो व्हिडिओ पाहून चाहत्यांचे डोळेही पाणावले  title=

मुंबई : ‘बिग बॉस 13’ फेम अभिनेत्री शहनाज गिल आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांच्यातलं प्रेम संपूर्ण देशाने पाहिलंय. बिग बॉस शो मध्ये या दोघांच्याही अफेयर्सच्याही चर्चा रंगल्या होत्या.मात्र या शोनंतर हृद्य विकाराच्या झटक्याने सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाल्याची घटना घडली होती. या घटनेतून सावरताना शहनाजला फार अवघड गेले होते. त्यात आता सिद्धार्थच्या मृत्यूच्या अनेक दिवसानंतर मोठी बातमी समोर आली आहे. शहनाज ऐवजी सिद्धार्थच्या आयुष्यात दूसरी आणखीण एक अभिनेत्री असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

‘बिग बॉस 13’च्या घरात शहनाजचं नाव सिद्धार्थ शुक्लासोबत जोडले गेले. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते. मात्र, सिद्धार्थ याचे हृद्य विकारच्या झटक्याने निधन झाले. यानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडून गेली होती. अभिनेत्री अजूनही त्या दुःखातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

सिद्धार्थ शुक्ला यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच हादरवून सोडले. अभिनेत्याच्या मृत्यूला अनेक महिने उलटून गेले आहेत, परंतु केवळ त्याच्या कुटुंबालाच नव्हे तर चाहत्यांनाही त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरणे कठीण जात आहे.

सिद्धार्थचे शेवटचे गाणे रिलीज

'जीना जरूरी है' असे या गाण्याचे लिरीक्स असून यामध्ये सिद्धार्थ शुक्लाची एक छोटीशी प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. या  व्हिडिओमध्ये सिद्धार्थ शुक्ला विशालच्या भावाच्या भूमिकेत दिसला. विशेष बाब म्हणजे या गाण्याच्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ शुक्लाचा हार घातल्याचेही चित्र दिसत आहे.ज्यामध्ये अभिनेत्याला पाहून तुमचे डोळे भरून येतील. 

सिद्धार्थ शुक्लाचे शेवटचे गाणे सोशल मीडियावर रिलीज झाले असून त्याला चांगली पसंती मिळतेय.