'कुली नंबर १' चित्रपटात कादर खानची भूमिका साकारणार 'हा' अभिनेता

'कुली नंबर १' चित्रपटात करिष्माच्या वडिलांची भूमिका दिग्गज अभिनेते कादर खान यांनी साकारली होती. 

Updated: Aug 11, 2019, 08:13 PM IST
'कुली नंबर १' चित्रपटात कादर खानची भूमिका साकारणार 'हा' अभिनेता title=

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये रिमेक साकारण्याचा काळ सुरू आहे. रीमेकच्या काळात जून्या चित्रपटांना पुन्हा दुजोरा देण्याचे काम सूरू आहे. आता आभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिष्मा कपूर स्टारर चित्रपट 'कुली नंबर १' चिपटात अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता वरूण धवण झळकणार आहेत. 'कुली नंबर १' चित्रपटाच्या माध्यमातून हे दोन कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. तब्बल २४ वर्षांनंतर 'कुली नंबर १' मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.  

प्रसिद्ध ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी रविवारी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरून चित्रपटाचा मोशन टिझर प्रदर्शित केला. 'कुली नंबर १' चित्रपट पुढच्या वर्षी १ मे रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. कही दिवसांपूर्वी चित्रपटाचा पोस्टर जारी करण्यात आला. 

चित्रपट साकारण्याची चर्चा सुरू झाली तेव्हापासून प्रत्येकाला फक्त एकच प्रश्न सतावत होता, तो म्हाणजे चित्रपटामध्ये करिश्माच्या वडिलांची भूमिका कोण साकारणार. 'कुली नंबर १' चित्रपटात करिष्माच्या वडिलांची भूमिका दिग्गज अभिनेते कादर खान यांनी साकारली होती. 

तर कादर खान यांच्या निधनानंतर 'कुली नंबर १' चित्रपटाच्या सिक्वेस मध्ये जेष्ठ अभिनेते परेश रावल वडिलांच्या भूमिकेला न्याय देणार आहेत. परेश रावल यांच्या विनोदी अभिनयाने सर्व चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यामुळे आता 'कुली नंबर १' चित्रपटाच्या सिक्वलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.