इन्स्टाग्रामच्या फेक फॉलोअर्स यादीमध्ये 'या' अभिनेत्रींचा समावेश

संशोधनामध्ये जगभरातल्या सर्व सेलेब्रिटींच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची तपासणी केली होती. 

Updated: Aug 11, 2019, 02:15 PM IST
इन्स्टाग्रामच्या फेक फॉलोअर्स यादीमध्ये 'या' अभिनेत्रींचा समावेश  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोन यांचे अभिनय कौशल्य फक्त हिंदी सिनेसृष्टी पूरताच मर्यादीत नाही, तर त्यांनी हॉलिवूड मध्येसुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. जगातल्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांच्या यादीत या दोन अभिनेत्रींचा समावेश होतो. या दोघींच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्याच प्रमाणे इन्स्टाग्रामच्या फेक फॉलोअर्सच्या यादीत टॉप १० मध्ये या दोघींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे भरतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या फेक फॉलोअर्सची संख्या १ कोटींपेक्षा सुद्धा जास्त आहे. 

दरम्यान, इंस्टीट्यूट ऑफ कन्टेपररी म्यूझिक परफॉरमेंच्या संशोधनातून हे फेक आकडे स्पष्ट झाले आहेत. या संशोधनामध्ये जगभरातल्या सर्व सेलेब्रिटींच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची तपासणी केली होती. त्यामध्ये असे अढळून आले की, देसी गर्ल आणि दीपिकाच्या फेक इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या फार जास्त आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार दीपिका पादुकोनच्या फेक इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या यादीमध्ये ६व्या क्रमांकावर आहे. तिच्या चाहत्यांची संख्या ४५ टक्के इतकी आहे, तर प्रियांका फेक इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या यादीमध्ये १० स्थानावर आहे. त्याचप्रमाणे तिच्या चाहत्यांची संख्या ४३ टक्के आहे.

फेक सोशल मीडिया फॉलोअर्सच्या यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सुद्धा आहे. त्याच्या फेक इन्स्टाग्राम चाहत्यांची संख्या ४४ टक्के इतकी आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार विराट एका पोस्टसाठी चक्क १.४० कोटी रूपये घेतो.