कोलकाता : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या आठवड्यात झालेल्या एका अपघातातून थोडक्यात बचावले. त्यांच्या मर्सिडीज कारचा मागचा टायर अचानक निघाला होता. सुदैवाने त्यांना या अपघातात इजा झाली नाही.
एका वरिष्ठ अधिका-यांनी बुधवारी सांगितले की, ज्या ट्रॅव्हल एजन्सीकडून कार मागवण्यात आली होती, त्या एजन्सीला पश्चिम बंगाल सरकारकडून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अमिताभ बच्चन हे राज्य सरकारच्या निमंत्रणावर २३व्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन समारोहासाठी आले होते. ते शनिवारी सकाळी एअरपोर्टला जात होते, तेव्हाच ही दुर्घटना घडली.
अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’च्या ९ व्या सीझनमध्ये दिसले होते. यावेळी या शोला चांगला टीआरपी मिळाला होता. असा अंदाज लावला जात होता की, यावेळी हा कार्यक्रम अधिक चालेल. पण अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीमुळे हा सीझन लवकर आटोपता घ्यावा लागला.