करणी सेनेची दीपिकाला नाक कापण्याची धमकी

‘पद्मावती’ सिनेमाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. दीपिका पादुकोनच्या वक्तव्याने नाराज झालेली करणी सेना अधिक संतापली असून त्यांनी दीपिकाला धमकी दिली आहे.

Updated: Nov 16, 2017, 01:51 PM IST
करणी सेनेची दीपिकाला नाक कापण्याची धमकी title=

जयपूर : ‘पद्मावती’ सिनेमाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. दीपिका पादुकोनच्या वक्तव्याने नाराज झालेली करणी सेना अधिक संतापली असून त्यांनी दीपिकाला धमकी दिली आहे. त्यामुळे आता या सिनेमाच्या रिलीजचा अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. 

दीपिकाच्या वक्तव्याने नाराज झालेल्या करणी सेनेने दीपिकाचं नाक कापण्याची धमकी दिली आहे. ते म्हणाले की, लक्ष्मणने शूर्पणखाचं नाक कापलं होतं, करणी सैनिक सुद्धा त्याप्रकारे नाक कापू शकतात’.

याआधी दीपिका म्हणाली होती की, या सिनेमाचं प्रदर्शन कुणीही थांबवू शकत नाही. हा सिनेमा रिलीज होणारच. आम्ही केवळ सेन्सॉर बोर्डाला उत्तर दिलं आहे. मला माहिती की या सिनेमाचं रिलीज कुणीही रोखू शकत नाही. 

दीपिकाच्या या वक्तव्यामुळे राजपूत समाजात मोठी नाराजा पसरली आहे. करणी सेने प्रदेश अध्यक्ष महिपाल सिंह मकराणा यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, दीपिकाचं हे वक्तव्य भडकवणारं आहे.