Kisi Ka Bhai Kisi ki Jaan Box Office Collection : अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याच्या चित्रपटांप्रती चाहत्यांमध्ये असणारं कुतूहल ही काही नवी बाब नाही. दरवर्षी जणू प्रत्येक चाहत्याला भेटणं शक्य होत नाही, म्हणून हा अभिनेता (Ramzan Eid) ईदच्या निमित्तानं थेट चित्रपटच प्रेक्षकांच्या भेटीला आणतो. चाहत्यांसाठी भाईजानकडून मिळणारी ही अनोखी ईदीच असते. प्रत्येक वेळी चाहतेसुद्धा त्याच्या या कलात्मक ईदीची वाट पाहत असतात. यंदाच्या वर्षीसुद्धा हेच चित्र आणि हीच उत्सुकता होती, पण सलमानचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि उत्सुकता क्षणात निराशेमध्ये रुपांतरित झाली. (KKBKK KISI ka bhai Kisi ki Jaan Box Office Collection latest update in marathi)
2023 म्हणजेच यंदाच्या वर्षी सलमानचा मल्टीस्टारर 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi ki Jaan) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला खरा, पण अजून एक आठवडाही पूर्ण झालेला नसतानाच चित्रपटाची कमाई ढासळताना दिसत आहे. आकर्षक बाब म्हणजे अनेकला कमाईचा आलेख उंचावत असल्याचं लक्षात येतं पण, यावेळी मात्र चित्र काहीसं बदललं. आठवड्याअखेरची सुट्टी आणि ईद या कारणास्तव सलमानच्या चित्रपटाला समाधानकारक सुरुवात मिळाली.
नव्या आठवड्याची सुरुवात आणि त्यानं अर्धा आठवडा संपूनही या आकड्यांनी उसळी घेतलीच नाही. पहिल्या दिवशी चित्रपटानं 15.81 कोटी रुपये कमवले. त्यानंतर शनिवारी 25.75 कोटी रुपये आणि रविवारी 26.61 कोटी रुपयांची कमाई केली. पण, त्यानंतर मात्र हे आकडे कोलमडले.
सोमवारी चित्रपटानं अवघे 10.17 कोटी रुपये कमवले, तर मंगळवारी हा आकडा 6.12 कोटींवर पोहोचला. थोडक्यात आतापर्यंत या चित्रपटाच्या कमाईत तब्बल 39.82 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत दिली. आतापर्यंत सलमानच्या या चित्रपटानं 84.46 रुपयांची एकूण कमाई केली असली तरीही त्यातही समोर येणाऱ्या प्रतिक्रियाही फार समाधानकारक नाहीत हे महत्त्वाचं.
#KisiKaBhaiKisiKiJaan registers its first noticeable drop [39.82%], after the #Eid period… The mass pockets continue to dominate, but metros register a sharp decline… Eyes ₹ 93 cr [+/-] total in Week 1… Fri 15.81 cr, Sat 25.75 cr, Sun 26.61 cr, Mon 10.17 cr, Tue 6.12 cr.… pic.twitter.com/vpN13vtRCy
— taran adarsh (@taran_adarsh) April 26, 2023
एरव्ही सलमान मोठ्या पडद्यावर झळकणार म्हटलं की, चित्रपटासाठीची उत्सुकता पाहण्याजोगी होती. पण, आता मात्र प्रेक्षकांचा प्राधान्यक्रमही बदलताना दिसत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकाच ठिकाणी जगभरातील कलाकृती पाहण्याची सुविधा असल्यामुळं कथा, संवाद अशाही गोष्टींना चाहते प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यातच वाहत्या प्रवाहासारख्या Bollywood Masala Movies कुठेतरी मागे पडताना दिसत आहेत. त्यामुळं सलमानसोबतच इतरही चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांनी हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं ठरत आहे.