शोककळा! बॉलिवूडवर कोसळला दु:खाचा डोंगर

बॉलिवूड विश्वातून सर्वांत मोठी बातमी, चित्रपटांत मोठं योगदान देणाऱ्या 'या' प्रसिद्ध व्यक्तीचं निधन

Bollywood Life | Updated: Aug 20, 2022, 02:06 PM IST
शोककळा! बॉलिवूडवर कोसळला दु:खाचा डोंगर  title=

मुंबई : बॉलिवूड़ चित्रपट विश्वावर शोककळा पसरली आहे. बॉलिवूड सिनेमांमध्ये आपलं बहूमुल्य योगदान देणाऱ्या या प्रसिद्ध व्यक्तीचं निधन झालं आहे. या निधनाने बॉलिवूड शोकसागराड बुडालाय. तसेच या निधनानंतर आता बॉलिवूड़  विश्वातून आता श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. 

'गदर एक प्रेम कथा'चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचे वडील प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते केसी शर्मा यांचे निधन झाल्याची घटना घडलीय. शुक्रवारी रात्री वयाच्या 89 वर्षीय हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आज मुंबईतील सांताक्रूझ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. या निधनानंतर बॉलिवूड विश्वावर शोककळा पसरलीय.  

निवेदन प्रसिद्ध 
अनिल शर्मा यांनी वडिलांच्या निधनानंतर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “माझे प्रिय वडील श्री कृष्णचंद्र शर्माजी यांचे 19 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाल्याबद्दल मी तुम्हाला अत्यंत दु:खाने कळवत आहे.आमचे प्रिय आणि आदरणीय मथुरावासी श्री कृष्णचंद्र जन्माष्टमीच्या मुहूर्तावर स्वर्गीय निवासस्थानाकडे निघाले आहेत. ते भगवान कृष्णाचे निस्सीम भक्त होते आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की कृपया त्यांच्या दिवंगत आत्म्यासाठी प्रार्थना करा. असे त्यांनी म्हटले आहे.

प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते के. सी शर्मा यांनी हुकूमत (Hukumat), तहलका (Tahalka), जवाब (Jawab), ऐलान ए जंग (Elaan-E-Jung), पुलिसवाला गुंडा (Policewala Gunda), अब तुम्हारे हवाले वतन साथियों (Ab Tumhare Hawale Watan Saathiyo) सारख्या अनेक मोठ्या फिल्मची निर्मिती केली आहे. के. सी. शर्मा द्वारे निर्मित बहुतेक सिनेमांचे श्रेय दिग्दर्शक मुलगा अनिल शर्मा यांना जाते. 'गदर एक प्रेम कथा'चा सिक्वेल 'गदर २' काही महिन्यातच सिनेमागृहात येऊ शकतो, अशावेळी अनिल शर्मा यांना पितृशोक झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.