'कौन बनेगा करोडपती’ मध्ये सून ऐश्वर्याच नावं घेताच, संतप्त अमिताभ बच्चन यांची खळबळजनक प्रतिक्रिया

:  'कौन बनेगा करोडपती’ चा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 20, 2022, 01:57 PM IST
'कौन बनेगा करोडपती’ मध्ये सून ऐश्वर्याच नावं घेताच, संतप्त अमिताभ बच्चन यांची खळबळजनक प्रतिक्रिया title=

मुंबई :  'कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. ‘कौन बनेगा करोडपती’चे हे 14 वे पर्व सुरु आहे. शोमध्ये अमिताभ स्पर्धकांशी खूप गप्पा मारत खेळ पूर्ण करताना दिसतात. हा शो नेहमीच स्पर्धकांनी सांगितलेल्या त्यांच्या संघर्षाच्या गोष्टींमुळे आणि अमिताभ यांनी सांगितलेल्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. मात्र, यावेळी एका स्पर्धकानं बिग बीं यांच्यासमोर आपली सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख केला. यावर अमिताभ यांनी मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. 

आणखी वाचा : King Cobra च्या तोंडातून निघाला विषारी साप, ती घटना पाहून नागरिकही झाले थक्का, Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

शोच्या या आगामी एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी शोमध्ये व्हिडीओ क्रिएटर ऐश्वर्या हॉट सीटवर दिसत आहे. तिनं शोमध्ये एक व्हिडीओ दाखवला, ज्यात ती गजोधर चाची ची भूमिका साकारताना दिसते आणि बोलते की, 'हाय, मी गजोधर काकू आहे. माझी केबीसीमध्ये निवड झाली आहे आणि म्हणूनच मी अॅटिट्यूडमध्ये आहे. अमिताभ जी, तुम्ही आमच्या हृदयाचे ठोके वाढवत आहात.'

आणखी वाचा : जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर महिला छाटतात स्वत: च बोट! हदरवणारी परंपरा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : Boycott Laal Singh Chaddha वर विजय देवरकोंडाचं वक्तव्य, म्हणाला 'तुमच्यामुळे लाखो...'

व्हिडीओ संपताच स्पर्धक ऐश्वर्या अमिताभ यांना बोलते की, तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडलं, गजोधर चाची की ऐश्वर्या? या प्रश्नावर बिगी बी टॉपिक बदलत, म्हणाले पुढचा प्रश्न हा आहे की... अमिताभ यांनी ही रिअॅक्शन यासाठी दिली कारण ऐश्वर्या त्यांच्या सूनेचं नाव आहे. यामुळे त्यांनी या प्रश्नाला इग्नोर केले. 

आणखी वाचा : 'माझ्यामुळे भारतीय रेल्वेचं उत्पन्न वाढलं', करीना कपूरचा गजबचा Attitude

यावेळी प्रेक्षकांना या शोमध्ये अनेक नवीन बदल पाहायला मिळत आहेत. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यावेळी शोमध्ये 75 लाख रुपयांच्या प्रश्नाचा एक नवीन टप्पा जोडण्यात आला आहे. त्याचबरोबर यंदा बक्षिसाची रक्कम 7 कोटींवरून 7.5 कोटी करण्यात आली आहे.