KBC 16 Question on Mahabharat : छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपति' या शोकडे सगळे माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. सगळ्यांना यातून अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. यंदाचा या शोचा 16 वा सीजन सुरु आहे. या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये हॉट सीटवर राजस्थानचे रवि कुमार बसले होते. त्यांनी या शोमध्ये 12 लाख 50 हजार पर्यंतच्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिली. मात्र, त्यांची गाडी ही 25 लाखाच्या प्रश्नावर येऊन थांबली. आता तुम्ही विचार करत असाल की असा कोणता प्रश्न होता ज्याचं उत्तर ते देऊ शकले नाही. खरंतर हा प्रश्न 'महाभारत' शी संबंधीत आहे. चला तर त्याविषयी जाणून घेऊया.
राजस्थानचे रवि कुमार यांनी अमिताभ बच्चनला सांगितलं की त्यांना रोज पाणी खरेदी करावं लागतं. कारण त्यांच्या परिसरात पाण्याची कमी आहे. त्यानंतर अमिताभ यांनी सरकारला या प्रकरणात थोडं लक्ष घालण्याची विनंती केली आहे. रवी हे सुपर सवालचं देखील उत्तर देतात. ज्यात विचारण्यात येतं की अनम सेहरावतनं 2024 च्या पॅरिस ओलम्पिकमध्ये कोणत्या खेळासाठी रौप्य पदक पटकावलं? तर रवी यांनी लगेच कुस्ती म्हणतं तो टप्पा पार केला. त्यानंतर रवी यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगत म्हणाले की ते चार भाऊ-बहीण आहेत. मोठा भाऊ घर चालवण्यासाठी नेहमी बाहेर राहिले. तर वडील हे मजदूर होते. एका कंस्ट्रक्शन साइटवर दुर्घटनेत त्यांचा हात तुटला. ज्यामुळे 6 महिने खूप त्रास सहन करावा लागला होता. आमच्यावर कर्ज झालं होतं. पैसे येण्याचा कोणताही स्त्रोत राहिला नव्हता. त्यांनी हे देखील सांगितलं की त्यांच्यावर 7 लाख रुपयांचं कर्ज आहे आणि नोव्हेंबरमध्ये लग्न देखील आहे. तर लग्नासाठी रवी यांनी अमिताभ यांना देखील आमंत्रण दिलं.
हेही वाचा : 'पत्नीला सोडून दुसऱ्या रुममध्ये...'; एआर रहमान यांच्या साडूनं सांगितला गायकाच्या हनिमूनचा किस्सा
दरम्यान, रवी यांनी 12,50,000 पर्यंतच्या प्रश्नांची उत्तर दिली आणि 25,00,000 च्या प्रश्नावर येऊन ते अडकले. तिथे त्यांना विचारण्यात आलं की महाभारतात कोणी भीष्म यांना वरदान दिलं होतं की ते तेव्हाच मरतील जेव्हा त्यांची इच्छा असेल? पण रवीला माहित नव्हतं आणि लाइफलाइन देखील नव्हतं. त्यामुळे त्यानं शो तिथेच सोडला. त्यानंतर अमिताभ यांनी सांगितलं की योग्य उत्तर हे शांतनु होतं.