एखाद्याने किती सुंदर असावं... 70 वर्षांच्या रेखांवर खिळल्या साऱ्यांच्याच नजरा

मनीष मल्होत्राने दिलेल्या दिवाळी पार्टीत बॉलिवूड अवतरलं होतं. यावेळी बॉलिवूडमधील सगळे कलाकार उपस्थित होते. यावेळी सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या त्या अभिनेत्री रेखा यांच्यावर. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 23, 2024, 02:46 PM IST
एखाद्याने किती सुंदर असावं... 70 वर्षांच्या रेखांवर खिळल्या साऱ्यांच्याच नजरा title=

डोक्यात झेंडूचा गजरा, सिंदुर, कानात मोठे कानातले गोल्डन आणि ऑरेंज रंगाची कांजिवरम साडी... हा होता 70 वर्षीय रेखा यांचा दिवाळी पार्टीतील लूक. फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने नुकतीच दिवाळी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी उपस्थित होते. यामध्ये शाहिद कपूर-मीरा ते अगदी करण जोहर, गौरी खान, सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी सारखी मंडळी उपस्थित होते. एवढंच नव्हे तर स्टार किड्स देखील होते. पण या सगळ्यांपेक्षा जास्त चर्चा झाली ती रेखा यांची. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रेखाला पाहताच मनीष मल्होत्राने तिच्या जवळ जाऊन तिचे स्वागत केले. त्यानंतर त्याने रेखासोबत फोटो देखील काढले. हा क्षण इतका अनोखा होता की, सगळेच रेखाकडे बघत होते. कारण होतं तिचं सौंदर्य. रेखा केशरी रंगाच्या कांचीवरम साडीत पार्टीत आल्याचे पाहून सर्वजण थक्क झाले. रेखाचे अफाट सौंदर्य पाहून तिचे वय 70 वर्षे आहे असे कोणीही म्हणू शकत नाही.

कुंकू, हातात बांगड्या... 

या दिवाळी पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी रेखा या अतिशय लक्षवेधी ठरल्या. कुंकू, लाल लिपस्टिक आणि हातभर बांगड्या या अंदाजात रेखा पार्टीत दिसल्या. एवढंच नव्हे रेखा यांनी पापाराझीचीं चौकशी केली ज्यामुळे पुन्हा एकदा तिने सगळ्यांचं मन जिंकलं. पापाराझीला विचारलं की, 'जेवलात की नाही तुम्ही?'

या वयातही असं सौंदर्य 

रेखाच्या व्हायरल व्हिडिओवर युझर्सकडून अनेक कमेंट येत आहेत. एका यूझरने लिहिले आहे की, 'कोण म्हणेल की ती 70 वर्षांची आहे? दुसरी कमेंट आहे की, '70 आणि 80 च्या दशकातील क्रश.' आणखी एका यूझरने लिहिले, 'रेखा जी आजही किती सुंदर आहे.' आणखी एक कमेंट लिहिली होती, 'रेखा जी दररोज अधिक तरुण आणि सुंदर होत आहेत.'