केबीसी 10 : या व्यक्तीने प्रभावीत झाले अमिताभ बच्चन

कोण आहे ही व्यक्ती 

केबीसी 10 : या व्यक्तीने प्रभावीत झाले अमिताभ बच्चन  title=

मुंबई : अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती सिझन 10 चा शुक्रवारी कर्मवीर एपिसोड प्रदर्शित झाला. या कर्मवीर एपिसोडमध्ये सामाजिक कार्याशी संबंधीत असलेल्या लोकांना स्पर्धक म्हणून बोलावलं जातं. 9 नोव्हेंबर रोजी जल पुरूषाच्या नावाने ओळखले जाणारे लोकप्रिय राजेंद्र सिंह हॉट सीटवर होते. 

गेल्या अनेक वर्षांपासून राजेंद्र सिंह जल संरक्षणामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत. जागरूकतेच्या भावनेने राजेंद्र सिंह पाण्याची माहिती सामान्य नागरिकांना देतात. त्यांनी 1975 साली भारत संघ नावाच्या एनजीओमार्फत या कार्याला सुरूवात केली.

केबीसी दरम्यान राजेंद्र सिंह यांनी सांगितलं की, जर पृथ्वीवरील पाणी वाचवलं नाही तर पुढचं विश्व युद्ध हे पाण्यासाठी होईल हे नक्की. या कार्यक्रमात राजेंद्र सिंह यांनी उत्तम खेळ खेळत कोणतीही लाइफलाइन न वापरता 3 लाख जिंकले. पुढे ते या कार्यक्रमातून 25 लाख रुपये जिंकण्यात यशस्वी ठरले. 

कार्यक्रम संपताना अमिताभ बच्चन यांनी राजेंद्र सिंह यांना विचारलं की, पाणी वाचवण्यासाठी काय काय करायला हवं? यावर राजेंद्र सिंह यांनी सांगितलं की, पाणी वाचवण्यासाठी सकाळपासूनच सुरूवात करावी. दात खासताना कमीत कमी पाण्याचा वापर करावा. तसेच पावसाचं पाणी वाचवणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. यावर बिग बी म्हणाले की, आम्हाला या सगळ्यातून प्रेरणा घेऊन, पाणीच जीवन आहे असं वागलं पाहिजे.