Katrina Kaif ला चेहऱ्याची सर्जरी करणं पडलं महागात

कतरिना कैफ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. 

Updated: Nov 4, 2021, 07:06 PM IST
Katrina Kaif  ला चेहऱ्याची सर्जरी करणं पडलं महागात title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ  तिची फिगर आणि सौंदर्य टिकवण्यासाठी ओळखली जाते. कोरोनाच्या कालावधीनंतर आता कतरिनाचा पहिला चित्रपट 'सूर्यवंशी' रिलीजसाठी सज्ज आहे. मात्र चित्रपट रिलीज होण्यापूर्वी कतरिना कैफला तिच्या लूकमुळे ट्रोल केले जात आहे.

कतरिना कैफ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या अभिनेत्री तिचा आगामी चित्रपट 'सूर्यवंशी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अक्षय कुमार कतरिनासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तिच्या व्यस्त टाईमटेबलमधून कॅटला ट्रोलर्सच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. त्याचं कारण म्हणजे तिच्या बोटॉक्स सर्जरीमधला फरक कतरिनाच्या नव्या लूकमध्ये स्पष्ट दिसतोय.

ट्रोलर्स म्हणाले बोटॉक्स क्वीन
सेलिब्रिटींना अनेकदा त्यांचा रंग, लुक, आकार, अभिनय कौशल्यामुळे ट्रोल केलं जातं. यावेळी कतरिनाने एका मॅगझीन कव्हरसाठी फोटोशूट केलं आहे. तिच्या लूकमुळे ट्रोलर्सनी तिच्यावर निशाणा साधला आहे. कतरिना कैफने नुकताच सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. नेटिझन्सनी अनेकवेळा तिच्या आणि विकी कौशलच्या नात्याचा समाचार घेतला आहे. एका यूजरने लिहिलं की, कतरिना कैफचं लग्न कधी करणार. 

सगळं बोटॉक्स आहे असं म्हणत अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं.  अभिनेत्री 38 वर्षांची आहे आणि तिने बोटॉक्सबद्दल कधीही कोणतीच पुष्टी दिलेली नाही. अभिनेत्री सध्या तिचा आगामी चित्रपट 'सूर्यवंशी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रणवीर सिंग, अजय देवगण मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 5200 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे.