लग्नानंतर तिसऱ्या महिन्यातच कतरिनाची ही अवस्था; फोटो पाहून काय म्हणावं सुचेना

कतरिना कैफ आणि विकी कौशल आता लग्नानंतर आपलं नवा संसार बसवण्यात मग्न, पण...  

Updated: Mar 16, 2022, 04:24 PM IST
लग्नानंतर तिसऱ्या महिन्यातच कतरिनाची ही अवस्था; फोटो पाहून काय म्हणावं सुचेना  title=

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी डिसेंबर महिन्यात लग्न केलं. कतरिना कैफ आणि विकी कौशल आता लग्नानंतर आपलं नवा संसार बसवण्यात मग्न आहेत. विकी कौशल आणि तिच्या सासऱ्यांच्या मते कतरिना कैफ पूर्णपणे भारतीय संस्कृतीत रंगली आहे. विकी आणि कतरिना कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करत असतात. 

आता देखील विकीने कतरिनासोबत एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे दिसून येत आहे, की दिवसागणिक त्यांच्यातील नातं घट्ट होत आहे. कतरिनाने एका वेगळ्या अंदाजात सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. 

फोटोमध्ये कतरिना आणि विकीने सन ग्लासेस घातले आहेत. सध्या त्यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एवढंच नाही तर चाहते देखील त्यांच्या फोटोंवर भरभरून कमेंट आणि लाईक्स करत आहेत.