'या' कारणामुळे कतरिना कैफ आमिर खानची 'दिवानी'

 गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सातव्या आसमानवर आहे. आणि त्याला कारणही देखील तसंच आहे.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 14, 2017, 06:47 PM IST
'या'  कारणामुळे कतरिना कैफ आमिर खानची 'दिवानी' title=

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सातव्या आसमानवर आहे. आणि त्याला कारणही देखील तसंच आहे.

बॉलिवूडमधील ही एकमेव अभिनेत्री आहे जिच्याकडे तिन्ही खानचे सिनेमे आहेत. कतरिनाकडे शाहरूख, सलमान आणि आमिर या तिघांचे सिनेमे आहेत. आमिर खान बद्दल बोलायचं झालं तर 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' मध्ये कतरिना महत्वाच्या रोलमध्ये दिसणार आहे. आणि हे स्क्रीनवर दुसऱ्यांदा दिसत आहे आमिर आणि कतरिना कैफ दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. या अगोदर दोघंही 'धूम ३' या सिनेमांत दिसले होते.  ''ठग्स ऑफ हिंदुस्तान" च्या सेटवर सध्या कतरिना फक्त आमिर खानच्या नावाची माळ जपत आहे. 

कतरिना आमिर खानच्या वजन कमी - जास्त करण्यावर हैराण.... 
एका वेबसाऊटने दिलेल्या माहितीनुसार, कतरिना हे जाणून हैराण आहे की आमिर खान कमी वेळात वजन कमी-जास्त कसं करतो. 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' च्या सेटवर पाहिलं आहे की, कतरिना आमिर खानला अतिशय उत्सुकतेने त्यांच्या डाएटबद्दल जाणून घेत होती. आणि कतरिनाचं अशा प्रकारे कौतुक करणं स्वाभाविक आहे. कारण दंगलमध्ये आमिरचं जे वजन आपण पाहिलं ते अतिशय धक्कादायक आहे. 

आमिर खान अशा पद्धतीने घेतो आपल्या खाण्या - पिण्याची काळजी 
सध्या आमिर खान ऑर्गेनिक फूड घेत आहे. आपल्या सिनेमाच्या सेटवर तो स्वतःचा टिफिनच घेऊन पोहोचतो. त्याचप्रमाणे वेळेत जेवण्याबाबत देखील आमिर खान अलर्ट असतो. आमिर खानने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत देखील बाइकिंग, ट्रेकिंग आणि स्वीमिंग यांच्या मदतीने तो दररोज ४५०० कॅलरी बर्न करत असे. मी कमी खातो आणि वर्क आऊट जास्त करतो. त्याने सांगितलं की, मी १५०० कॅलरी खातो तर ४५०० कॅलरी बर्न करतो. आमीर खानची ही मेहनत त्याची बॉडी बघून समजू शकतो.