सुनीधी चौहान देणार लवकरच 'गोड बातमी'

लोकप्रिय गायिकांच्या यादीत या गायिकेचं नाव आवर्जून घेतलं जातं ती म्हणजे सुनीधी चौहान. आज सुनीथी आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. या बरोबरच तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी तिने शेअर केली आहे. आणि ती म्हणजे सुनीधी चौहान लवकरच "आई" होणार आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 14, 2017, 05:56 PM IST
सुनीधी चौहान देणार लवकरच 'गोड बातमी' title=

मुंबई : लोकप्रिय गायिकांच्या यादीत या गायिकेचं नाव आवर्जून घेतलं जातं ती म्हणजे सुनीधी चौहान. आज सुनीथी आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. या बरोबरच तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी तिने शेअर केली आहे. आणि ती म्हणजे सुनीधी चौहान लवकरच "आई" होणार आहे. 

इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, शिला की जवानी हे गाणं लोकप्रिय करणारी गायिका सुनीधी चौहान पाच महिन्याची गरोदर आहे.  नुकताच प्रदर्शित झालेल्या 'टॉयलेट- एक प्रेमकथा' या सिनेमातील 'बखेडा' हे गाणं देखील सुनीथीने गायलं आहे. अतिशय बबली आणि बहुआयामी गायिका असलेली सुनीधीच्याघरी लवकरच पाळणा हळणार आहे. तिची ही गुडन्यूज फक्त तिच्या कुटुंबियांना आणि अगदी जवळच्या लोकांसोबत तिने शेअर केली आहे. सध्या ती आपल्या बेबी बम्पसोबत बाहेरजाणं सध्या तरी टाळत आहे. पण गुड न्यूज असल्यामुळे सुनीधी फार एक्साइट असल्याचं देखील दिसत आहे. 

सध्या सुनीधी आपलं आई होणं अतिशय सुंदरपद्धतीने सेलिब्रेट करत आहे. ही गोड बातमी कन्फर्म करण्यासाठी सुनीधीच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यांनी असं म्हटलं की, सुनीधीच्या जीवनातील हे नवं कोरं पानं आहे. आणि तिच्यासोबतच आम्ही देखील हा क्षण साजरा करण्यासाठी खूप सज्ज आहोत. त्यामुळे आजी- आजोबा होण्यासाठी आम्ही देखील उत्सुक आहोत. 

नुकतंच तिने आपल्या आधीच्या कमिटमेंट पूर्ण केल्या आहेत. तसेच आता तिचे कुटुंबिय म्हणून आम्ही तिला बाहेरचे शो करण्यास पाठवणार नाही. कारण आता तिच्या तब्बेतीच्या दृष्टीकोनातून ते योग्य नाही. सुनीधी चौहानला आज कोणत्याही इन्ट्रोडक्शनची गरज नाहीये. हिंदी, मराठी, कन्नड, तेलगु, तमिळ, पंजाबी अशा कितीतरी भाषांमध्ये आज तिने आपल्या गायकीची जादू चालवली आहे. आज ती म्युझिक इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध गायिका आहे. केवळ गायिका म्हणूनच नाहीतर स्टेज परफॉर्मर म्हणूनही सुनीधीने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. २०१३ मध्ये तिने एशियाच्या टॉप ५० सेक्सिएस्ट लेडीजमध्येही जागा मिळवली होती.