विकी-कॅटचा शाही लग्न सोहळा, विकी कौशलकडून फोटो शेअर, म्हणाला...

बहुचर्चित आणि प्रतिक्षित असा विकी कौशल आणि कतरिना कैफचा लग्न सोहळा नुकताच पार पडला. 

Updated: Dec 10, 2021, 09:17 AM IST
विकी-कॅटचा शाही लग्न सोहळा, विकी कौशलकडून फोटो शेअर, म्हणाला... title=

मुंबई: बहुचर्चित आणि प्रतिक्षित असा विकी कौशल आणि कतरिना कैफचा लग्न सोहळा नुकताच पार पडला. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर फिरत होते. मात्र आता विकी कौशलने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर शाही लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोमध्ये पाहू शकत अगदी शाही थाटात हा लग्न सोहळा पार पडला आहे. दोघांनीही मोगऱ्याचा हार वरमालामध्ये घातल्याचं दिसत आहे. कतरिनाने सुंदर लाल रंगाचा लेहंगा घातला आहे. तर विकी कौशलने पारंपरिक कुर्ता घातल्याचं दिसत आहे. 

या शाही लग्नाचे फोटो विकी कौशलनं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. नव्या प्रवासाची सुरुवात म्हणत विकी कौशलनं हे फोटो शेअर केले. त्यासोबत हार्टचे इमोजी देखील जोडले आहेत. 

राजेशाही थाट नेमका काय असतो, हेच हे फोटो पाहताना लक्षात येत आहे. बऱ्याच फॅन पेजेसवर हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

सर्वच स्तरांतून विकी आणि कतरिनावर शुभेच्छांचा वर्षावही करण्यात येत आहे. अनेक नियम, माध्यमांवरील बंदी असतानाही या बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्याचा फोटो व्हायरल झाल्यामुळे चाहत्यांमध्ये भलताच आनंद पाहायला मिळत आहे.