Kartik Aaryan लवकरच अडकणार लग्न बंधनात!

Kartik Aaryan चे चाहते त्याच्या लग्नाच्या बातमीची कधी पासून प्रतिक्षा करत आहेत. अशात कार्तिक आर्यननं नुकताच एका कार्यक्रमात त्याच्या लग्नविषयी मोठा खुलासा केला आहे. इतकंच काय तर त्याचा व्हिडीओ देखील हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. मग तुम्ही पाहिलात का व्हिडीओ!

Updated: Mar 19, 2023, 04:10 PM IST
Kartik Aaryan लवकरच अडकणार लग्न बंधनात!

Kartik Aaryan Getting Married : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. आर्यनचा नुकताच 'शेहजादा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. आर्यनच्या चाहत्यांमध्ये सगळ्यात जास्त संख्याही तरुणींची आहे. आर्यन कुठेही गेला तर तिथे एकतरी कोणी चाहती असते जी त्याला लग्नाची मागणी घालते. पण आता कार्तिकनं त्याच्या लग्नाविषयी एक मोठी घोषणा केली आहे. आर्यननं सगळ्यांसमोर त्याच्या लग्नाची घोषणा केली आहे. इतकंच काय तर त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

कार्तिकनं त्याच्या एका कार्यक्रमातील व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत ‘झी सिने अवॉर्ड’च्या मंचावर धमाकेदार बॅन्डसह कार्तिक आर्यनने एन्ट्री घेतल्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक म्हणतो, 'तुम्हाला वाटलं असेल की मी बॅन्ड का घेऊन आलो, सध्या इंडस्ट्रीमध्ये कित्येक लोकांचे बॅन्ड वाजत आहेत, म्हणजेच लोक लग्न करत आहेत. सगळ्यांची विकेट पडत आहे, आता मी एकटाच सिंगल राहिलो आहे. त्यामुळे मलाही लग्नाचे लाडू खावेत असं वाटत आहे. त्यामुळे या मंचावर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मी लवकरच बोहल्यावर चढणार आहे.'

पाहा व्हिडीओ - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, अनेकांना आता खरं वाटलं असेल की आर्यन खरंच लग्न बंधनात अडकणार आहे. मात्र, हे खरं नसून हा या कार्यक्रमातील एका पेरफॉर्मन्सचा भाग होता. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना या विषयी कळताच तिथे उपस्थित असलेले लोक खूप हसू लागले होते. असं असलं तरी कार्तिक आर्यनच्या चाहत्यांना त्याच्या लग्नाची बातमी कधी येईल, याची अपेक्षा करत आहेत. तर कार्तिक आर्यनच्या काही चाहत्यांची इच्छा आहे की त्यानं लग्न बंधनात अडकू नये. 

हेही वाचा : अगली बार बडा झटका देंगे; पुन्हा एकदा Salman Khan ला जीवे मारण्याची धमकी!

कार्तिकच्या डेटिंग लाइफविषयी बोलायचे झाले तर आतापर्यंत कार्तिकचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले. त्या अभिनेत्रींच्या यादीत सारा अली खान, क्रिती सेननसोबत जोडले गेले. तर सध्या कार्तिक आर्यनचे नाव हे बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची बहीण पश्मिनाशी जोडण्यात आले आहे. कार्तिक आणि पश्मिना रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, लवकरच कार्तिक आर्यन ‘आशिकी ३’ आणि ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात दिसणार आहे. तर नुकताच प्रदर्शित झालेला त्याचा शेहजादा हा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा Ala Vaikunthapurramuloo या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.