कपिलचे दमदार कमबॅक ; शेअर केला फनी व्हिडिओ...

कॉमेडियन कपिल शर्मासाठी २०१७ हे वर्ष काही खास ठरले नाही. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 4, 2018, 01:43 PM IST
कपिलचे दमदार कमबॅक ; शेअर केला फनी व्हिडिओ... title=

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मासाठी २०१७ हे वर्ष काही खास ठरले नाही. त्याचा 'फिरंगी' हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करू शकला नाही.मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल शर्मा लवकरच टी.व्ही. वर आपला नवा कॉमेडी शो घेऊन येणार आहे.

कपिलचे कमबॅक

अलिकडेच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यात त्याने ‘द कपिल शर्मा शो’चे अरो़डा साहेब ही व्यक्तीरेखा साकारत एक फनी व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओ बनवण्यासाठी स्नॅपचॅटचा वापर करण्यात आला आहे.

 द कपिल शर्मा शो बंद

गेल्या काही काळापासून कपिल खूप आजारी होता. त्याचमुळे त्याचा प्रसिद्धीच्या झोतात असलेला द कपिल शर्मा शो बंद करावा लागला. त्यापूर्वी एक-एक कलाकार शो सोडून जात होते. अखेर या शो वर पडदा पडला.त्याचदरम्यान सुनील ग्रोवर आणि कपिलच्या वादाच्या घटनाही समोर आल्या होत्या.

 

 

Junior arora sahib on Snapchat - KapilSharmak9

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on