पॅडमॅन चित्रपटाचे दुसरे गाणे प्रदर्शित...

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या पॅडमॅन चित्रपटाचे दुसरे गाणे प्रदर्शित झाले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 4, 2018, 01:16 PM IST
पॅडमॅन चित्रपटाचे दुसरे गाणे प्रदर्शित... title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या पॅडमॅन चित्रपटाचे दुसरे गाणे प्रदर्शित झाले. 'हूबहू है तुमसा दिल ये...' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात अक्षय खूप मस्त दिसत आहे. त्याचबरोबर गाण्याच्या दरम्यान त्याचे काही डायलॉग्स देखील प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. चित्रपटाचे गाणे पूर्णपणे अक्षय कुमार चित्रीत केलेले आहे.

सामान्य व्यक्ती ते पॅडमॅन

गाण्यात अक्षयचा सामान्य व्यक्ती ते पॅडमॅन बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर सोनम कपूरशी झालेली मैत्री देखील दाखवण्यात आली आहे. तसंच दोघंही शाळेत सॅनिटरी नॅपकिन्स वाटताना दिसत आहेत.

गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस

या गाण्याचा व्हिडिओ प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल. या चित्रपटाची निर्मिती ट्विंकल खन्ना तर दिग्दर्शन बाल्कीने केले आहे. हे गाणे अमित त्रिवेदीने गायले आहे. यापूर्वी गाण्याचे टायटल सॉन्ग प्रदर्शित करण्यात आले आहे.

असा आहे चित्रपट...

हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा अरुणाचलम मुरुगनाथन या व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे. अरुणाचलमने आपल्या गावात महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर त्याने सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्याची मशिन बनवली.