खर्च भागत नाहीये; विनोदाचा किंग कपिल शर्माला एकदम काय झालं?

Kapil Sharma Vlog: कपिल शर्मा आपल्या हटके विनोदी शैलीसाठी कायमच ओळखला जातो. त्याचा शो हा सध्या तूफान गाजतो आहे. नव्या रूपात हा शो आता आला आहे. सध्या त्याच्या एका व्हिलॉगनं चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 16, 2023, 09:28 PM IST
खर्च भागत नाहीये; विनोदाचा किंग कपिल शर्माला एकदम काय झालं? title=
June 16, 2023 | kapil sharma vlog goes viral says he is struggling with finances here is the reason

Kapil Sharma Vlog: कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा हा आपल्या विनोदीशैलीसाठी लोकप्रिय आहे. 'द कपिल शर्मा शो'मधून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. परंतु आता त्याचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. हल्ली अनेक अभिनेते आणि अभिनेत्री ही युट्यूबवरही सक्रिय असतात. ते सोशल मीडियावर तर सक्रिय असतातच सोबतच ते इन्टाग्राम रिल्सवरही सक्रिय असतात. सध्या कपिल शर्माचा एक नवा आणि पहिला व्हिलॉग हा रिलिज झाला आहे त्यामुळे कपिल शर्माची आज चांगलीच चर्चा रंगली आहे. यामध्ये त्यानं गमतीत एक डायलॉग म्हटला आहे.

त्यामुळे त्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. जिममधून त्यानं हा व्हिलॉग केल्याचे कळते आहे. त्यातून तो यावर आजूबाजूला पाहत रोस्टिंग करताना दिसतो आहे. या व्हिलॉगमध्ये तो म्हणतो की, खर्च भागत नसल्यानं मी आता व्हिलॉग बनवायला सुरूवात केली आहे. 

त्यानं हा व्हिडीओ लॉग आपल्या शोच्या एका एपिसोडच्या आधी शेअर केला आहे. विकी कौशल आणि सारा अली खानसोबतच्या एका शुटिंगच्या आधीचा हा व्हिडीओ आहे. आपलं जीममधील वर्कआऊट झाल्यानंतर तो फिल्म सिटीमध्ये जायला निघतो. त्यानंतर तो सेटवर पोहचतो आणि मग आपल्या चाहत्यांना अपडेट देतो. तेवढ्यात तो सेटवर एक फेरफटकाही मारून येतो. ते ग्रीन रूममधल्या डायरेक्टरशी संवादही साधतो आणि त्यांच्यावरही एक जोक पास ऑन करतो आणि म्हणतो हे फारच काम करायला लावतात. 

हेही वाचा - 'बाईपण भारी देवा' चित्रपटात 'या' कलाकार दांपत्याची लेक करणार एन्ट्री!

त्यानंतर तो आपल्या शोमधल्या शूटिंगचेही अपडेट्स देतो. त्यानं यावेळी सांगितले की त्याचे शुटिंग फार लांबले. यावेळी त्यानं बिग बॉसचा सेट दाखवला आणि कॉमेडी नाईट्स विथ कपिलचा जुना सेटही दाखवला. काही डेली सॉपच्या शुटिंगच्याही झलक त्यानं दाखवल्या. थोडक्यात त्यानं फिल्मी सिटीची सफर घडवून दिली. 

कपिल शर्मा हा कायमच आपल्या या आगळ्यावेगळ्या शोसाठी लोकप्रिय असतो. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्याचा कपिल शर्मा हा शो नव्यानं प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही दिवसांपुर्वी सुधा मूर्ती, रविना टंडन आणि गुनित मौंगा यांनी कपिल शर्माच्या शोला हजेरी लावली होती. त्यांचा हा एपिसोड प्रचंड गाजला होता. सध्या त्याच्या शोमध्ये फार वेगवेगळ्या तऱ्हेचे पाहूणे येत आहेत आणि त्यांचा एपिसोड फारच गाजतो आहे. आता प्रेक्षाकांना उत्सुकता आहे की त्याच्या नव्या एपिसोडमध्ये कोणते पाहुणे येणार आहेत आणि काय काय गमतीजमती रंगणार आहेत.