KBC मध्ये अमिताभ सुंदर मुलींना विचारतात असे प्रश्न? कपिल शर्माकडून गुपित उघड

'कपिल शर्मा शो'मध्ये सचिन खेडेकर, रवी किशन आणि सोनाली कुलकर्णी  गेस्ट म्हणून सहभागी झाले होते.

Updated: Dec 19, 2021, 07:58 PM IST
KBC मध्ये अमिताभ सुंदर मुलींना विचारतात असे प्रश्न? कपिल शर्माकडून गुपित उघड title=

मुंबई : 'द कपिल शर्मा शो'मध्ये सचिन खेडेकर, रवी किशन आणि सोनाली कुलकर्णी  गेस्ट म्हणून सहभागी झाले होते. शोमध्ये कपिल शर्माने सांगितलं की, सचिन खेडेकर 'कौन बनेगा करोडपती' 'या मराठी व्हर्जन शोला  होस्ट करतात. यासोबत कपिलने मजेशीर पद्धतीने सांगितलं की, 'केसीबी'मध्ये अमिताभ बच्चन सुंदर मुलींना सोपे प्रश्न विचारतात. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्याला खूप पसंती मिळत आहे.

सुंदर मुलींना अमिताभ विचारतात साधे प्रश्न?
व्हिडिओमध्ये सचिन खेडेकर म्हणतात, 'केबीसी या शोला अमिताभ बच्चन यांची ओळख आहे. यानंतर कपिल म्हणतो, 'मी एक गोष्ट पाहिली आहे की सोनालीसारखी सुंदर मुलगी तिथे गेली तर बच्चन साहेबांचे प्रश्न वेगळे होतात.

गुलाबाचं फुल कोणत्या रंगाचं आहे? आणि आमच्यासारखे लोकं गेले तर विचारतील हुमायून कधी आला? या वर्षी हुमायून आला होता असं जरी सांगितलं तर ते पुढे विचारतील. कोणत्या दिवशी आला होता,  पुढे विचारतील, किती वाजता आला?' कपिलच्या या गोष्टी ऐकून सगळे जोरजोरात हसू लागतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.