Raj Kundra च्या अटकेनंतर कपिल शर्माचा तो व्हिडिओ व्हायरल; उत्पन्नाबाबत प्रश्न केला उपस्थित

व्हिडिओमध्ये नक्की आहे तरी काय? 

Updated: Jul 20, 2021, 08:09 AM IST
Raj Kundra च्या अटकेनंतर कपिल शर्माचा तो व्हिडिओ व्हायरल; उत्पन्नाबाबत प्रश्न केला उपस्थित  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लिल  चित्र चित्रीत केल्या प्रकरणी  गुन्हा शाखेने अटक केली आहे. त्यामुळे कुंद्रा आणि शेट्टी कुटुंबा भोवतीच्या अडचणी वाढल्या आहेत. या बातमीनंतर राज कुंद्राचे अनेक व्हायरल व्हिडिओ समोर येत आहेत. दरम्यान कॉमेडीयन कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये राज पत्नी शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टीसोबत उपस्थित राहिला होता. तेव्हा कपिलने राजला त्याच्या उत्पन्नाबद्दल विचारलं. कपिलच्या या प्रश्नानंतर जमलेल्यांना हासू आवरलं नाही. पण राजला अटक झाल्यानंतर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 

सांगायचं झालं तर, राज कुंद्राच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असून कुंद्राने कारस्थान रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. सोमवारी जवळपास 7 ते 8 तास चौकशी केल्यानंतर संध्याकाळी कुंद्रा यांना अटक करण्यात आली. 

मंगळवारी कुंद्रा यांना न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.  राज कुंद्रा विरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे राज कुंद्रा यांना अटक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. आता या प्रकरणी अजून किती रहस्य समोर येतील हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे.