पतीने सोडल्यानंतर मुलांच्या शाळेच्या फीसाठी पैसे नसणारी गायिका आज कोट्यवधींची मालकीण

तीन मुलं झाल्यानंतर पतीने सोडलं,  मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी पैसे नसणारी 'ही' गायिका आता एका गाण्यासाठी घेते एवढी मोठी रक्कम   

Updated: Jun 2, 2022, 11:13 AM IST
पतीने सोडल्यानंतर मुलांच्या शाळेच्या फीसाठी पैसे नसणारी गायिका आज कोट्यवधींची मालकीण title=

मुंबई : 'बेबी डॉल’ आणि  ‘चिटियाँ कलाईयां’ असे सुपरहीट गाणी बॉलिवूडला देणारी गायिका म्हणजे कनिका कपूर. गेल्या काही दिवसांपासून कनिका कपूर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अनेक संकट वाट्यात आल्यानंतर देखील कनिका झुकली नाही. कनिकाचं फार कमी वयात लग्न झालं, तीन मुलं झाल्यानंतर पतीने सोडलं. तिच्यावर एक वेळ अशी होती की, मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठीही तिच्याकडे पैसे नव्हते. पण आज ती करोडोंच्या मालमत्तेची मालकीण आहे.

कनिकाचं पहिलं लग्न
फार लहान वयात कनिकाचं लग्न झालं. वयाच्या 18 व्या वर्षी कनिकाचं उद्योगपतीसोबत लग्न झालं. लग्नानंतर तिने तीन मुलांना जन्म दिला. तीन मुलांच्या जन्मानंतर कनिकाचं पतीसोबत घटस्फोट झाला. या घटनेनंतर गायिकेला अनेक संकटांचा सामना करावा लागला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor)

पण कनिकाने हार मानली नाही. कनिकाला  'बेबी डॉल’ आणि  ‘चिटियाँ कलाईयां’ गाण्याने उच्च शिखरावर पोहोचवलं. आता कनिकाची नेटवर्थ जवळपास 7 ते 8 कोटी आहे. 

याशिवाय कनिका एका गाण्यासाठी 15 ते 20 लाख रुपये घेते. कनिका कपूरच्या आवाजासोबतच तिच्या सौंदर्याचेही लोकांना वेड लागलं आहे. इंस्टाग्रामवर तिचे 10 मिलियनपेक्षा अधिरक फॉलोअर्स आहेत. 

कनिकाचं दुसरं लग्न
बिझनेसमन गौतम हथिरामनसोबत कनिकाने दुसर लग्न केलं आहे. दोघांच्या लग्नाच्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. आईच्या दुसऱ्या लग्नात कनिकाची तिन्ही मुलं देखील प्रचंड आनंदी होती.