Baahubali 3 : एस एस राजामौली यांनी बनवलेल्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली आहे. त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांपैकी 2 चित्रपट आहेत ज्याची चर्चा ही परदेशात देखील झाली. त्यांच्या चित्रपटांनी इतकं कलेक्शन केलं की सगळ्यांना मोठा धक्का बसला. त्यात एका फ्रॅंचायझीचे दोन चित्रपट अर्थाच 'बाहुबली' आणि 'बाहुबली 2' आणि आरआरआर हे चित्रपट आहेत. या चित्रपटांनी केलेल्या बॉक्स ऑफिस कलेक्शननं सगळीकडे एकच चर्चा रंगली होती. दरम्यान, 'कंगुवा' चित्रपटाच्या निर्मात्यांनी असं काही वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे 'बाहुबली 3' ची चर्चा सुरु झाली आहे.
सूर्या आणि बॉबी देओलचा 'कंगुवा' हा चित्रपट 14 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं पोस्ट आणि त्यातही सूर्या आणि बॉबीच्या लूकनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहेत. सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु होती. या चित्रपटाचं पोस्टर आणि कलाकारांचे लूक पाहिल्यानंतर हा चित्रपट लार्जन देन लाइफ असल्याचं म्हटलं आहे. चित्रपटाच्या निर्माते केई. ई. ज्ञानवेल राजानं याविषयी वक्तव्य केलं आहे. त्यांनी 'कंगुवा' च्या सीक्वेलला घेऊन चर्चा करत असताना यावेळी राजा यांनी राजामौली यांचा उल्लेख केला आहे. त्यातही त्यांनी 'बाहुबली' च्या सीक्वेलला घेऊन असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.
राजानं सांगितलं - बाहुबली 3 सध्या प्लॅनिंग स्टेजवर आहे. गेल्या आठवड्यात चित्रपटाच्या निर्मात्यांशी बोलत असताना याविषयी कळलं. त्यांनी 'बाहुबली 1' आणि 'बाहुबली 2' बॅक टू बॅक बनवण्यात आले, आता ते लोकं काही काळानंतर 'बाहुबली 3' बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासोबत त्यांनी 'कल्कि 2898 एडी' आणि 'सालार' चं देखील उदाहरण दिलं की कशा प्रकारे दोघांमध्ये थोडा काळ ठेवण्यात आला होता. असं झालं की 'कंगुवा' सोबत होऊ शकतं. खरंतर, केई. ई. ज्ञानवेल राजा देखील बाहुबली चित्रपटाशी जोडलेले आहेत. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली' च्या तमिळ व्हर्जनचे हेच डिस्ट्रीब्यूटर होते.
हेही वाचा : लग्नानंतर असा साजरा झाला राधिका मर्चंटचा वाढदिवस; सुहाना-आर्यन ते धोनीपर्यंत आणखी कोण होते खास पाहुणे?
'बाहुबली 3' ला घेऊन जेव्हा 'बाहुबली' चे लेखक विजयेंद्र प्रसाद आणि प्रभासशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. खरंतर, हे लक्ष वेधी असण्याचं कारण आहे की 'बाहुबली' दिग्दर्शक राजामौली यांनी यावर्षी मे महिन्यात बाहुबलीच्या अॅनिमेटेड सीरिजविषयी चर्चा करताना सांगितलं की त्यांना 'बाहुबली' ला खूप मोठं करायचं आहे. 'बाहुबली: द बिगिनिंग' नं भारतात 420.05 कोटींची कमाई केली. तर 'बाहुबली 2: द कॉन्क्लूजन' नं भारतात 1,030.42 कोटींची कमाई केली. त्यासोबत 'बाहुबली 2' हा जगभरात सगळ्यात जास्त कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.