'मी खरी देशभक्त...' असं म्हणत कंगनाचं राजकारणावर वक्तव्य

मी खरी देशभक्त आहे... हरामखोर नाही... कंगनाचं ट्विट चर्चेत   

Updated: Mar 22, 2021, 08:19 AM IST
'मी खरी देशभक्त...' असं म्हणत कंगनाचं राजकारणावर वक्तव्य  title=

मुंबई : कायम वादाचा मुकूट डोक्यावर मिरवणारी अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने आता तर थेट राजकारणावर प्रश्न उपस्थित केला आहे. कंगना कायम  चालू घडामोडींवर आपलं मत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत, वादाच्या भोवऱ्यात राहते. सध्या महाराष्ट्रात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्राने राजकारणात खळबळ माजवली आहे. असं असतानाचं कंगनाने या प्रकरणात उडी घेतली आहे . 

यावेळी कंगनाने महाराष्ट्रातील व्यवस्थेवर निशाणा साधला आहे. कंगना ट्विट करत म्हणाली, 'मी जेव्हा  भ्रष्टाचार आणि महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराबाबत आवाज उठवला तेव्हा तेव्हा मला धमक्या देण्यात आल्या. माझ्यावर टीका करण्यायत आली. पण मी सगळ्या गोष्टींचं उत्तर दिलं. ' असं कंगना म्हणाली. 

शिवाय माझ्या आवडत्या शहराबद्दल  माझ्या निष्ठेबद्दल माझ्यावर बोट ठेवण्यात आलं. तेव्हा देखील मी गप्प राहिली. त्यानंतर माझं घर तोडण्यात आंल तेव्हा मात्र अनेकांनी आनंद साजरा केला. असं ट्विट करत तिने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

यासोबतच तिने एका ट्विटमधून मी हरामखोर नाही तर देशभक्त आहे. असं देखील म्हटलं आहे. 'येत्या काळात सर्व काही समोर येईल. मी खंबीर आहे. त्यामुळे  हे सिद्ध होत आहे की माझ्या नसांमधून वाहणाऱ्या राजपूत रक्तात देशाबद्दल खरं प्रेम आहे.' असं देखील तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे.