'रिक्षा चालक ते प्रभावी व्यक्ती....', कंगनाच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार हाती घेतल्यानंतर कंगना रानौतची प्रतिक्रिया  

Updated: Jul 1, 2022, 08:48 AM IST
'रिक्षा चालक ते प्रभावी व्यक्ती....', कंगनाच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा  title=

मुंबई : राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण तुफान तापलं होतं. या दरम्यान देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतल्यानंतर चर्चांना पुर्णविराम मिळाला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांनी त्यांना शुभेच्छ दिला. अभिनेत्री कंगना रानौतने देखील शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत अभिनेत्रीने एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री म्हणाली, 'रिक्षा चालवण्यापासून ते देशातील सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंत…अभिनंदन सर.' सध्या कंगनाची पोस्ट चर्चेत आहे. 

कंगना कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील चालू घडामोडींवर स्वतःचं मत मांडते.  नेहमी वादाचा मुकूट डोक्यावर घेऊन मिरवणारी कंगना कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. शिवसेनेची सत्ता गेल्याने मुख्यमंत्री पदाचा त्याग करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर अभिनेत्री कंगना रानौतने प्रतिक्रिया दिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कंगना म्हणाली 'शिवसेनाचं जर हनुमान चालिसा बॅन करत असेल, तर त्यांना खुद्द "शिव" देखीव वाचवू शकत नाही...' असं म्हणत कंगनाने उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर स्वतःचं मत इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत व्यक्त केलं आहे.