Kangana Ranaut angry on Nawazuddin Siddiqui wife Aaliya : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी (Nawazuddin Siddiqui) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. नवाजुद्दीन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची घरच्यांचे आणि पत्नीमध्ये मतभेद सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी नवजुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्धिकी (Mehrunisa Siddiqui) यांनी आपली सून आलियाविरोधात (Aaliya) पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता अशी बातमी समोर आली आहे की आता आलियाच्या वकिलानं नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबा विरोधात गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, आलियानं सोशल मीडियावर केला असून हा पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले. यावर आता बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतनं (Kangana Ranaut) तिची प्रतिक्रिया दिली आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ त्याची पत्नी आलियानं शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नवाजुद्दीन त्याच्या घराच्या गेटबाहेर उभा असल्याचे दिसत आहे. तर त्याची पत्नी आलिया घरातून बोलत आहे आणि त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणावर कंगनाने इन्स्टाग्रामवर आलियाला फटकारताना एक पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. 'हे सर्व पाहून खूप वाईट वाटले... नवाज साहबचा त्यांच्या घराबाहेर असा अपमान केला जात आहे... त्यांनी सगळं सर्वस्व कुटुंबाला दिले, टिकू वेड्स शेरूच्या सेटवर रिक्षानं यायचं आता गेल्यावर्षी तर हा बंगला घेतला. आता हे पाहून मला खूप वाईट वाटत आहे.
कंगना रणौत म्हटले की, 'नवाज साहब यांनी आजपर्यंत जे काही कमावले ते त्यांच्या भावांना दिले. एक्स पत्नी, जिला त्यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी घटस्फोट दिला होता, ती मुलांचे संगोपन करत होती. तर आलिया मुलांसोबत दुबईत राहत होती. त्यांनी आलियासाठी मुंबईत एक फ्लॅटही विकत घेतला होता... आणि त्यांनी त्याच्या आईच्या नावावर बंगला विकत घेतला होता आणि आता एक्स वाईफ तो घेण्यासाठी आली आहे. कंगना म्हणाली, 'नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी माझ्याकडून घराची रचना करण्यासाठी टिप्स घेतल्या, आम्ही खूप उत्साहित होतो. आम्ही एकत्र हाऊस पार्टी केली होती.'
पुढे याविषयी बोलताना कंगना म्हणाली, हा काय आगाऊपणा आहे. मला रडू येतयं. अभिनय क्षेत्रात कलाकार म्हणून काम करणं कठीण आहे. हे घर स्वत: जवळ ठेवण्याचा निर्णय ती कसा काय घेऊ शकते आणि ती त्याला घराच्या बाहेर अस बंद कस करू शकते. नवाजुद्दीनच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याच्या हातात आता ‘टीकू वेड्स शेरू’, ‘नूरानी चेहरा’, ‘बोले चूडिया’ आणि ‘अफवाह’ सारखे अनेक चित्रपट आहेत.