भारतात कोरोना व्हायरसची लागण व्हावी, अभिनेत्याची धक्कादायक मागणी

कोरोना व्हायरसचा चीनमध्ये थैमाण 

Updated: Mar 1, 2020, 02:23 PM IST
भारतात कोरोना व्हायरसची लागण व्हावी, अभिनेत्याची धक्कादायक मागणी  title=

मुंबई : कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातलाच आहे. हा व्हायरस जगभर पसरला आहे. या व्हायरसच्या संसर्गामुळे आतापर्यंत 21 हजार हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने भारत चीनच्या अगदी जवळ असूनही आपल्या देशाला याचा फटका बसलेला नाही. मात्र एका अभिनेत्याने चक्क भारताला कोरोना व्हायरसची लागणी व्हावी अशी प्रार्थना देवाकडे केली आहे. 

बिग बॉसमुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता कमाल खान त्याचा वादग्रस्त वक्तव्यासाठी लोकप्रिय आहे. आता त्याने कोरोना व्हायरसशी संबंधित विधान केलं आहे. 'करोना वायरस लवकरात लवकर भारतात यावा अशी प्रर्थना मी देवाकडे करतो. असे झाल्यास देशातील लोक हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन असे धार्मिक मतभेद सोडून एकत्र येतील. आणि करोना वायरसशी झुंज देतील.” अशा आशयाचे ट्विट केआरकेने केले आहे.

कमाल खानचे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तांसत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.