...तर शाहरुख मला काटेरी चमच्याने भोसकेल; काजोलनं केला होता खुलासा

Kajol on her and Shah Rukh Khan's Friendship : काजोल आणि शाहरुख खान यांच्या मैत्रीविषयी सगळ्यांना माहित असताना आता काजालोनं शाहरुखविषयी एक गोष्ट सांगितली आहे. ते दोघे रात्री 3 वाजता देखील एकमेकांचा कॉल रिसिव्ह करतील पण काजोलनं जर ही गोष्ट केली तर शाहरुख नक्कीच चिडेल. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 30, 2023, 06:00 PM IST
...तर शाहरुख मला काटेरी चमच्याने भोसकेल; काजोलनं केला होता खुलासा title=

Kajol on her and Shah Rukh Khan's Friendship : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि काजोल यांची जोडी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारी आहे. त्या दोघांची जोडी ही आयकॉनिक जोड्यांपैकी एक आहे. त्यांची केमिस्ट्री ही खूपचं चांगली आहे. त्याचं कारण त्यांची मैत्री देखील आहे. दोघं खऱ्या आयुष्यात खूप चांगले मित्र आहेत. इतकंच नाही त्यांना एकमेकांच्या वेगवेगळ्या गोष्टी देखील माहित आहेत. एकमेकांविषयी ते दोघे मोकळेपणानं बोलताना दिसतात. त्यात काजोल तर कधीच कोणत्याही विषयावर बोलताना स्वत: ला थांबवत नाही. आता काजोलनं तिच्या आणि शाहरुखच्या मैत्रीवर वक्तव्य केलं होतं. 

काजोलनं एका मुलाखतीत तिच्या आणि शाहरुखच्या मैत्रीवर वक्तव्य केलं आहे. काजोलनं Mashable India ला दिलेल्या मुलाखतीत तिच्याविषयी सगळ्यात जास्त गूगल केलेल्या विषयांवर वक्तव्य केलं आहे. या वेळी बोलताना काजोल म्हणाली जर तिनं रात्री 3 वाजता ही शाहरुख खानला फोन केला तरी तो तिचा कॉल रिसिव्ह करेल. तेच जर शाहरुखनं तिला रात्री 3 वाजता कॉल केला तर ती रिसिव्ह करेल. त्यांची मैत्री अशी नाही की ते रोज एकमेकांना गूड मॉर्निंग बोलतील किंवा रोज एकमेकांना मेसेज करतील. फूल आणि काही फोटो पाठवतील. यावर मस्करी करत काजोल म्हणाली की जर तिनं असं केलं तर शाहरुख एक चांगला काटेरी चमचा घेईल आणि तिला भोसकेल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काजोल या आधी देखील तिच्या आणि शाहरुखच्या मैत्रीवर बोलली आहे. त्यावेळी तिनं 'करन-अर्जुन' या चित्रपटातील 'जाती हूं मैं' या लोकप्रिय ठरलेल्या गाण्याच्या शूटिंगचा किस्सा सांगितला होता. हे एक इंटिमेट गाणं होतं. त्याविषयी काजोलला काहीच कल्पना नव्हती की त्यात नक्की काय असणार आहे. तेव्हा शाहरुखनं तिला कशी मदत केली याविषयी दी हिंदूला दिलेल्या मुलाखतीत काजोलला विचारण्यात आले होते. त्यावर काजोल म्हणाली की तिला काही कल्पना नव्हती. तिला कसं तरी वाटतं होतं. शाहरुख खाननं तिला कम्फर्टेबल केलं. शाहरुखला माहित असतं की महिलांना कोणत्या गोष्टींमुळे कम्फर्टेबल वाटत नाही आणि कशानं कम्फर्टेबल वाटतं. तो कोणत्याही महिलेला जर कम्फर्टेबल वाटत नसेल तर त्याचं 100 टक्के देत कम्फर्टेब फील करण्याचा प्रयत्न करतो. 

हेही वाचा : OMG 2 मधील अक्षय कुमारची भूमिका बदला, सेन्सॉर बोर्डाचा आदेश!

पुढे शाहरुख एक सहकलाकार म्हणून कसा आहे याविषयी सांगताना म्हणाली की, 'मी आजवर इतक्या कलाकारांसोबत काम केलं आहे. पण तो सगळ्यात जास्त समजुतदार अभिनेता आहे. त्याला सगळ्या गोष्टी कळत असतात.'