नवी दिल्ली : 'कौन बनेगा करोडपती ९' च्या ग्रँड फिनाले एपिसोडचे प्रसारण नुकतेच पार पडले. यावेळी हॉटसीटवर बाल कामगार विरूद्ध लढणारे आणि बालकांच्या अधिकारांबाबत मोहिम करणारे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी बसले होते.
यावळी त्याच्यासोबत त्यांची पत्नी सुमेधा या देखील होत्या. शोच्या या एपिसोडमध्ये कैलाश सत्यार्थी आणि अमिताभ बच्चन यांनी आपआपल्या जीवनातील काही अनुभव शेअर केलेत.
कैलाश सत्यार्थी यांनी या शोमध्ये एकूण ५० लाख रुपये जिंकले. जिंकणारा पैसा ते बालकांच्या कल्याणासाठी खर्च करणार आहे. यावेळी सत्यार्थी यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा आणि मुलांवर झालेल्या अत्याचाराच्या थरकाप उडविणाऱ्या काहण्या सांगितल्या.
सत्यार्थी यांनी स्वतःवर झालेल्या हल्ल्याबाबत सांगितले की, सर्कसमध्ये काम करणाऱ्या १३-१४ वर्षांच्या मुला-मुलींचे खूप शोषण होत होते. यावेळी सत्यार्थी यांनी याविरूध्द आवाज उठवला. सर्कसच्या मालकांच्या तावडीतून मुलांना सोडविण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी माझ्यावर हल्ला झाला .
त्यांनी सांगितले की, कोणत्याही पद्धतीने मुलींनी सर्कसमध्ये चांगली कामगिरी केली तर बक्षीस म्हणून सर्कसचा मालक त्यांच्यावर रेप करायचा. तसेच त्यांनी काही चूक केली तर शिक्षा म्हणून त्यांच्यावर रेप केला जायचा. सत्यार्थींची गोष्ट ऐकून सर्व दर्शक सून्न झालेत, अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
यानंतर सत्यार्थी यांनी एका लहान मुलीची वेदनादायक काहणी सांगितली, जी आपल्या वडिलांच्या वासनेची शिकार झाली होती. त्यांनी सांगितले की, एक नराधन बाप आपल्या मुलीवर नेहमी रेप करायचा. एकदा त्याच्या क्रूरतेचा कळस झाला, जेव्हा त्याची मुलगी आजारी होती. आणि आपल्या वडिलांना हात जोडून विनंती करत होती की आज सोडून द्या, पण त्या नराधम बापाने सोडलं नाही, तिच्यावर रेप केला.