'बिग बॉस 11'च्या घरात भाभीजीच्या एक्स बॉयफ्रेंडची वाईल्ड कार्ड एण्ट्री

टीव्हीच्या छोट्या पडद्यावर कुरूक्षेत्र ठरलेल्या 'बिग बॉस ११'च्या घरात आता नवे ट्विस्ट आले आहे. या ट्विस्टमुळे 'भाभीजी घर पर हैं'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री शिल्पा शिदेंच्या अडचणीत चांगलीच वाड होण्याची शक्याता आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 7, 2017, 07:51 PM IST
'बिग बॉस 11'च्या घरात भाभीजीच्या एक्स बॉयफ्रेंडची वाईल्ड कार्ड एण्ट्री title=

नवी दिल्ली : टीव्हीच्या छोट्या पडद्यावर कुरूक्षेत्र ठरलेल्या 'बिग बॉस ११'च्या घरात आता नवे ट्विस्ट आले आहे. या ट्विस्टमुळे 'भाभीजी घर पर हैं'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री शिल्पा शिदेंच्या अडचणीत चांगलीच वाड होण्याची शक्याता आहे.

शिल्पाच्या अडचणीचे कारण असे की, 'बिग बॉस 11'मध्ये आता रोमित राज वाईल्ड कार्ड एण्ट्री करणार आहे. त्यामुळे त्याच्या एण्ट्रीचा सर्वाधीक धक्का हा रोमित राजला बसणार आहे. बॉलीवुडलाइफ. कॉमने दिलेल्या वृत्तानुसार रोमित राज आणि शिल्पा शिंदे यांच्यात एकेकाळी मधूर आणि तितकेच नाजूक संबंध होते. इतकेच नव्हे तर, २००९मध्ये आपल्या वयापेक्षा ३ वर्षांनी छोट्या असलेल्या रोमित राज सोबत शिल्पा बोहल्यावर चढण्याचे स्वप्नही पाहात होती. पण, कदाचीत नियतीला हे मान्य नसावे. दोघांच्याही आयुष्यात अशा घडामोडी घडल्या की, हे लग्न होता होता राहिले.

दरम्यान, शिल्पाने आपल्या ब्रेकअपची माहिती एका मुलाखतीदरम्यान स्वत:च दिली होती. या मुलाखतीदरम्यान शिल्पाने म्हटले होते की, माझी लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती. मी लग्नासाठी ड्रेसही, दागिणे, खरेदी केले होते. इतकेच नव्हे तर, मी कार्डही छापून तयार केले होते. पण, लग्नाच्या ठरलेल्या तारखेपूर्वी एक महिना आधिच आमचे लग्न मोडले. मला वाटते की, मी घेतलेला तो निर्णय योग्य होता. मी खूप खूश आहे कारण आता मला अॅडजेस्ट करण्याची गरज भासणार नाही. माझे निर्णय मी स्वत: घेऊ शकते.