मुंबई : 'कच्चा बादाम' या गाण्याने संपूर्ण जगाला वेड लावलेल्या गायकाचा अपघात झाला आहे. गायक भुबन बड्याकार याचा पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये अपघात झाला आहे. ज्यामध्ये तो जबर जखमी झाला आहे. अपघातानंतर भुबनला तात्काळ रूग्णालयात दाखल केलं आहे. भुबनच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. (Kacha Badam singer Bhuban Badayakar accident in Birbhum West Bengal admitted in Hospital )
रिपोर्टनुसार, भुबन बड्याकरचा अपघात सोमवारी झाला आहे. भुबनने नुकतीच एक कार खरेदी केली. भुबन आता कार चालवायला शिकत होता. तेवढ्यातच हा अपघात झाला.
अपघातानंतर कच्चा बादाम फेम गायक सुपर स्पेशियलिटी रूग्णालयात दाखल आहे.
भुबन बड्याकर पश्चिम बंगालमध्ये शेंगदाणे विकायचं काम करतो. शेंगदाणे विकता विकता तो कच्चा बादाम हे गाणं गायचा ना. सोशल मीडियावर हे गाणं लोकप्रिय होऊन व्हायरल झालं. ज्यानंतर भुबन बड्याकर लोकप्रिय झाला.
भुबन बड्याकर हा मूळचा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील आहेत. दुबराजपूर ब्लॉक अंतर्गत कुरलजुरी गावात त्याचं घर आहे. भुबन याच्या पश्चात पत्नी, २ मुले व १ मुलगी असा परिवार आहे.
शेंगदाणे विकून भुबन बड्याकरची २०० ते २५० रुपयांची दिवसाची कमाई होती. पण आता लोकप्रिय झाल्यावर त्याने शेंगदाणे विकणे बंद केले आहे.
घरातील तुटलेल्या वस्तूंच्या बदल्यात भुबन शेंगदाणे विकतो हे विशेष. शेंगदाणे विकण्यासाठी तो दूरच्या गावीही जातात. तो दररोज 3-4 किलो शेंगदाणे विकतो आणि 200-250 रुपयांपर्यंत कमाई करतो.
मात्र, हे गाणे व्हायरल झाल्यानंतर त्याची कमाई वाढली आहे. त्याने शेंगदाणे विकणे बंद केलंय.