मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी स्टारर 'कबीर सिंग' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २० कोटींचा गल्ला जमवला. एकिकडे चाहत्यांचा उदंड प्रतिसाद असतानाच कबीर सिंगच्या उध्वस्त प्रेमाची ही कहाणी चित्रपटाला एका ग्रहणापासून मात्र तारु शकलेली नाही. चित्रपटाला ग्रहण लागण्याचे कारण की, चाहत्यांच्या पसंतीस पडलेला 'कबीर सिंग' लीक झाल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपट लीक झाल्याची माहिती नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. पायरेटेड वेबसाईट तमिळ रॉकर्सने 'कबीर सिंग' चित्रपट लीक केल्याचे सांगण्यात येत आहे.
यापूर्वीदेखील तमिळ रॉकर्सने अनेक चित्रपट लीक केले आहेत. 'दे दे प्यार दे', 'टोटल धमाल', 'अॅव्हेंजर्स: एन्ड गेम', 'बाहुबली २' यांसारखे चित्रपट तमिळ रॉकर्सकडून लीक करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे भाईजानचा 'भारत' चित्रपट देखील लीक करण्यात आला होता.
'कबीर सिंग' हा साऊथच्या 'अर्जुन रेड्डी' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'कबीर सिंग' चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे. शाहिद कपूर, कियारा आडवाणी, अर्जन बाजवा, कामिनी कौशल, सुरेश ओबेरॉय या कलाकारांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपपटाने सलग दुसऱ्या दिवशी ४२ कोटी रूपयांच्या कमाईपर्यंत मजल मारली आहे. चित्रपट येत्या दिवसांत किती चाहत्यांचे किती मनोरंजन करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
'कबीर सिंह' चित्रपटात शाहिद कपूर, कियारा आडवाणी, अर्जन बाजवा, कामिनी कौशल, सुरेश ओबेरॉय या कलाकारांनी भूमिका साकारली आहे.