Kavaalaa Japanese Reel: रजनीकांत यांच्या 'जेलर' या चित्रपटांची चांगली चर्चा आहे. त्यामुळे सध्या फक्त आणि फक्त चर्चा आहे ती म्हणजे रजनीकांत यांचीच. 'जेलर 'या चित्रपटातील 'कव्वाला' हे गाणं सध्या सर्वत्र गाजतं आहे. त्यामुळे या चित्रपटाची विशेष चर्चा रंगलेली आहे. त्यातून हे गाणं सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी जपानच्या एका फॅन्सही या गाण्याला डोक्यावर घेतलं आहे. यावेळी 'कव्वाला' या गाण्यावर त्यांनी एक रिल शेअर केलं आहे ज्याची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. हे रिल सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसते आहे. त्यामुळे या रिलची सर्वत्र पुन्हा एकदा चर्चा आहे. 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट आल्यानंतरही या गाण्यातील 'बहरला हा मधुमास' या गाण्याची सोशल मीडियावर चांगलीच क्रेझ पाहायला मिळाली होती.
त्यामुळे हे गाणं सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर या गाण्यावर अनेकांनी रील्स बनवले होते. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे 'कव्वाल्ला' या गाण्याची. 'बहरला हा मधुमास' हे गाणं सातासमुद्रापार पोहचले होते आणि सोबतच त्यावर जपानच्या युट्युबर्सनही भन्नाट रील तयार केला होता. सोशल मीडियावर सध्या वेगवेगळे रील्स व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून बॉलिवूडच्या गाण्यावरील असे अनेक रील्स असतात जे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. यावेळी या गाण्यानंही सोशल मीडियावर अक्षरक्ष: आग लावली आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगली चर्चा रंगलेली दिसते. तुम्ही या गाण्यावर रील केलं आहे का?
हेही वाचा : कपाळावर कसली खुण आहे? 'तो' फोटो शेअर करत ऐश्वर्या नारकर एका शब्दात म्हणाल्या...
यावेळी जपानचे सदिच्छादूत हिरोशी सुजूकी यांनी जपानची युट्युबर तरूणी मायो सानसोबत तुफान डान्स केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असून या गाण्यानं फारच कमी कालावधीत चांगलेच व्ह्यूज मिळवले आहेत. यावेळी नेटकऱ्यांनीही नाना तऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. माझं रजनीकांत प्रतीचं हे प्रेम आहे असं हिरोशी सुजूकी यांनी लिहिलं असून त्यांनी एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Kaavaalaa dance video with Japanese YouTuber Mayo san(@MayoLoveIndia)
My Love for Rajinikanth continues … @Rajinikanth #Jailer #rajinifansVideo courtesy : Japanese Youtuber Mayo san and her team pic.twitter.com/qNTUWrq9Ig
— Hiroshi Suzuki, Ambassador of Japan (@HiroSuzukiAmbJP) August 16, 2023
सध्या रजनीकांत याची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली आहे त्यामुळे त्यांच्या गाण्यांचीही तितकीच चर्चा असते. यावेळी हे गाणं सर्वत्र व्हायरल झालं आहे. त्यामुळे या गाण्याची क्रेझही प्रेक्षकांमध्ये वाढू लागली आहे.