अरे कोण म्हणतंय 'गदर 2' सुपरहिट? पाहा कमाईचे खरेखुरे आकडे

Gadar 2 World Wide Box Office Collection : एकीकडे 'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे तर दुसरीकडे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू शकला नाही. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 17, 2023, 01:37 PM IST
अरे कोण म्हणतंय 'गदर 2' सुपरहिट? पाहा कमाईचे खरेखुरे आकडे title=
(Photo Credit : Social Media)

Gadar 2 World Wide Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता  सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर त्याचा इतिहास रचणार असे चाहते म्हणत होते. चित्रपटानं सहा दिवसात 262.48 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे हा चित्रपट फ्लॉप झाल्याचे म्हटले जाते. भारतात चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत तर परदेशात मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला नाही. 

जेव्हा चित्रपटाच्या यशाविषयी चर्चा होते तेव्हा फक्त त्याच्या भारतातील बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी चर्चा केली जात नाही तर त्यासोबत परदेशात थोडक्यात भारतात केलेल्या कलेक्शनकची देखील चर्चा होते. भारतात हिट असलेला 'गरद 2' हा चित्रपट परदेशात मात्र, फ्लॉप ठरला आहे. परदेशातील प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता नाही असे म्हटले जाते. विकेंडला या चित्रपटानं 2.168 मिलियन अमेरीकी डॉलर म्हणजेच 17.99 कोटींती कमाई केली. चित्रपटाला 5 मिलियन अमेरिकी डॉलरचा आकडा पार करणं खूप कठीण होत आहे. जर चित्रपटाला  5 मिलियन डॉलरची कमाई करता येत नसेल तर तो चित्रपट वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये खूप वाईट काम करत असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा : VIDEO : 'अरे ले न फोटो', सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्यावर भडकला सनी देओल

'गरद 2' ची कमाई पाहता आता सनी देओलचा हा चित्रपट शाहरुखच्या पठाण चित्रपटाला बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मागे टाकेल का? कारण पठाणनं भारतात 524 कोटींची कमाई केली होती. तर चित्रपटानं वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 48.5 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. त्यानंतर रणबीर कपूरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' नं देखील वर्ल्ड बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 14 मिलियन डॉलरचा आकडा पार केला होता. त्यामुळे 'गरद 2' भारतात जरी पठाणला बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मागे टाकण्याची शक्यता असली तरी देखील परदेशातील किंवा मग वर्ल्ड वाईड कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर त्यात मागे टाकणं खूप कठीण आहे. 

'गदर 2' परदेशात कसं आणि किती केलं कलेक्श?

रिपोर्ट्सनुसार, यूएसमध्ये चित्रपटानं 1,213,190 डॉलरची कमाई केली आहे. यूकेमध्ये हा आकडा 203,377 डॉलरचा आहे. ऑस्ट्रेलियामध्ये चित्रपटानं  317,89038 डॉलरची कमाई केली आहे. जर्मनीमध्ये चित्रपटानं 39,546 यूरोची कमाई केली आहे. मलेशियात प्रदरर्शित झालेल्या चित्रपटानं 14,523 डॉलरची कमाई केली. न्यूझिलॅन्डमध्ये चित्रपटानं 133,685 डॉलरची कमाई केली आहे.