Jhund Teaser : फुरसत से आया ये 'झुंड' है

हा व्हिडिओ पाहाच...

Updated: Jan 21, 2020, 12:08 PM IST
Jhund Teaser : फुरसत से आया ये 'झुंड' है  title=
झुंड

मुंबई : 'मस्तीमे जीना है लेना ना देना है...' अशाच शब्दांच्या, काहीशा बम्बईया हिंदी भाषेचा बाज असणाऱ्या अंदाजात Jhund teaser 'झुंड' या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आला आहे. बिग बी अमिताभ बच्चन amitabh bachchan यांच्या आवाजाने या मिनिटभराच्या टीझरची सुरुवात होते, ज्यामध्ये चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला नेमकं काय येणार याचीच हलकीशी भनक प्रेक्षकांना देण्यात आली आहे. 

नागराज मंजुळेच्या दिग्दर्शनात साकारलेल्या 'झुंड' या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केल्यानंतर लगेचच टीझरही सर्वांच्या भेटीला आला. पोस्टरवर बिग बीची झलक दिसली तर, टीझरमध्ये एक झुंडच पाहायला मिळाली. कोणाच्या हाती लोखंडी साखळी, कोणाच्या हाती विट, कोणात्या हाती हॉकीस्टीक अशा रुपातील ही मंडळी नेमकी आहेत तरी कोण, याच प्रश्नांवर 'झुंड'बाबतची उत्सुकता वाढली आहे. 

अजय- अतुलच्या या सुप्रसिद्ध संगीतकार जोडीच्या दमदार संगीताची झलकही टीझरमध्ये वेगळी छाप सोडत आहे. त्यामुळे 'फुरसत से आया ये झुंड है', ही ओळ नागराजच्या या आगामी चित्रपटाविषयी एक वेगळीच वातावरण निर्मिती करत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

वाचा : 'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप

बिग बी अमिताभ बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिकेत असतील. त्यातही नागराजचा बॉलिवूडमधील हा पहिलाच चित्रपट आणि महानायकासोबतचं त्याचं नवखं समीकरण या सर्व गोष्टी चित्रपटाच्या जमेची बाजू ठरत आहेत. कायमच चौकटीबाहेरचे विषय अतिशय समर्पक आणि संवेदनशीलपणे जाताळण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नागराजच्या दिग्दर्शनाचं कौशल्य 'झुंड'च्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x