Jersey Trailer : प्रत्येक बाप-मुलाच्या जोडीने पाहावा हा व्हिडीओ, का होतोय

व्हिडीओ पाहताना वडील- मुलाचं नातं किती अव्यक्त तरीही किती घट्ट असतं याचीच जाणीव तुम्हाला होईल....   

Updated: Nov 24, 2021, 09:20 AM IST
Jersey Trailer : प्रत्येक बाप-मुलाच्या जोडीने पाहावा हा व्हिडीओ, का होतोय  title=

मुंबई :  'जर्सी' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना वडील आणि मुलामधील नातं जवळून  अनुभवता येणार आहे. वडील मुलाच्या वाढदिवसाची भेटवस्तू देण्यासाठी जीवाचा आटापिटा करताना दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे वडिलांकडे पैसे नाहीत. मुलाच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी वडिलांनी उचलेलं पाऊल सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर प्रचंड भावूक करणारा आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त 'जर्सी' सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा आहे. 

सिनेमात मुख्य भूमिकेची जबाबदारी अभिनेता शाहीद कपूरच्या खांद्यावर आहे. तर अभिनेत्री मृणाल ठाकूरने शाहीदच्या पत्नीच्या भूमिकेला न्याय दिला आहे. गौतम तिन्नुरी दिग्दर्शित 'जर्सी' सिनेमात शाहीदने क्रिकेटर म्हणून झळकणार आहे. शाहीद आणि मृणाल शिवाय चित्रपटात पंकज कपूर यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. 

एक खेळाडू क्रिकेट सोडून आपल्या मुलाची जर्सी विकत घेण्यासाठी मैदानात कसा परततो हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. हा सिनेमा 31 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहिद तब्बल दोन वर्षांनंतर 'जर्सी'मधून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे.