Just Neel Things फेम मित्राचा साखरपुडा; पाहा त्याचा नवा Reel

पाहा कोण आहे त्याची जोडीदार... 

Updated: Nov 24, 2021, 08:56 AM IST
Just Neel Things फेम मित्राचा साखरपुडा; पाहा त्याचा नवा Reel  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सोशल मीडियावर दररोज असंख्य रील्स, व्हिडीओ व्हायरल होत असतात. याच व्हिडीओ आणि रील्सच्या गर्दीमध्ये एक चेहरा सातत्यानं आपल्या समोर येतो. हा चेहरा समोर आला रे आला, की लगेचच हसू येतं. पुढे व्हिडीओ पाहून तर हास्याचा पूर वगैर येतो असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. 

हा चेहरा असतो Just Neel Things अशी ओळख असणाऱ्या एका मित्राचा. म्हणजेच नील साळेकर याचा. 

नेटकऱ्यांना आणि तरुणाईला ज्या मुलाचं फार फार कौतुक वाटतं, तोच हा नील.

अरे हा असं कसं करू शकतो, असं म्हणत नीलच्या व्हिडीओंवर रिअॅक्ट होणाऱ्या मंडळींनी आता पुन्हा एकदा त्याच्यावरच लक्ष केंद्रीत केलं आहे. कारणंही तसंच आहे. 

नीलच्या प्रोफाईलवर नुकतंच एक नवं रील पाहायला मिळालं. जिथे तो साखरपुडा करताना दिसत आहे. 

तुम्हाला हे रील जर फक्त इन्स्टाग्रामसाठी वगैरेच केलं आहे असं वाटत असेल तर, तसं नाहीये. कारण नीलचा खऱ्या आयुष्यात साखरपुडा पार पडला आहे. 

स्वत:च्याच साखरपुडा सोहळ्याची एक झलक त्यानं काही फोटोंच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आणली आहे. 

प्रत्यक्षातही नील या सोहळ्याच्या वेळी धमाल मस्ती करताना दिसला, हे पाहून त्याच्या फॉलोअर्सला कमाल आनंद झाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neel (@just_neel_things)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neel (@just_neel_things)

सोशल मीडियावर सध्या नीलच्या साखरपुड्याचा रील तुफान शेअर केला जात आहे. इतकंच नव्हे, हा आपला हक्काचा मित्र आहे, असं समजत मंडळी त्याच्या या नव्या प्रवासासाठी त्याला शुभेच्छाही देऊ लागले आहेत. 

दरम्यान, दैनंदिन जीवनातील प्रसंगांचाच आधार घेत नीलनं आतापर्यंत अनेक रील्स केले आहेत. वेब सीरिजमधूनही तो झळकला आहे. तेव्हा त्याच्या या रील्स किंवा वेब सीरिजपैकी तुमची आवडती कलाकृती कोणती हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.