मुंबई : शतकातला महानायक अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेला आणि वयाच्या ७५व्या वर्षीही जनमानसावर आपली छाप कायम ठेवणार अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन. अभिनय आणि मनोरंजन क्षेत्रात यशोशिखरावर असताना बच्चन यांनी राजकारणाचीही वाट चोखाळली होती. मात्र, त्यात त्यांना सपशेल अपयश आले. खरे तर, अमिताभ यांचे राजकारणात येणेच मुळी बच्चन कुटुंबासाठी मोठा भावनीक निर्णय होता. पण, लवकरच त्यांना कळले की हा निर्णय तसा फारसा फायदेशीर नाही. बच्चन यांच्या राजकारणातील अपयशावर आतापर्यंत अनेकांनी लिहिले बलले आहे. पण, राजकारणातील त्यांच्या अपयशाबद्धल स्वत: जया बच्चन यांनीच सांगितले आहे.
जया बच्चन यांनी इंडियन एक्सप्रेसच्या आयडीया एक्सचेंज कार्यक्रमात बोलताना अमिताभ यांच्या राजकारणातील अपयशाबाबत काही खुलासे केले. त्या म्हणाल्या, त्या म्हणाल्या राजकारण प्रवेश हा बच्चन कुटुंबियांसाठी मोठा नाजूक आणि तितकाच भावूक करणारा निर्णय होता. सर्वच कलाकार भावूक असतात. तसे, अमिताभही होते. कौटुंबिक मित्रत्वामुळे काँग्रेस पक्षात गेले. पण, लवकरच ते राजकारणातून बाहेर पडले. कारण, ते क्षेत्र त्यांना फारसे रूचले नाही.
दरम्यान, जया बच्चन या राजकारणात प्रदीर्घ काळ आहेत. पण, बच्चन हे राजकारणातून लगेच बाहेर पडले, असे विचारले असता, अमिताभ बंच्चन यांची शैली निराळी आहे. ती, राजकीय क्षेत्राशी मिळतीजुळती नाही. त्यामुळे ते राजकारणातून बाहेर पडले. ते राजकीय नेत्याप्रमाणे वागू आणि बोलूही शकत नाहीत. ते आपले व्यक्तिगत आयुष्य आपल्या स्टाईलने जगणारे व्यक्ती आहेत. तुम्ही जर एकाच वेळी दोन दोन जीवनशैली स्विकारल्या त्यातही अभिनय आणि राजकारण तर, तुमची अडचण होते. त्यामुळे त्यांनी लवकरच राजकारणातून माघार घेतली.
दरम्यान, अमिताभ बच्चन हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे खूप जवळचे मित्र होते. त्यामुळे मित्रत्वाच्या संबंधामुळेच बच्चन हे १९८४मध्ये राजकारणात आले. त्यांनी अलाहबाद मतदारसंघातून निवडणूक लढवली. महत्त्वाचे असे की, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांच्यासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून ते निवडूनही आले.