व्हिडिओ : ख्रिस गेलने केला 'तारे गिन-गिन'वर हटके डान्स

ख्रिसचा डान्स पाहताच त्याची एनर्जी ध्यानात येते. अनेक लोकांनी त्याच्या हटके डान्सचे कौतुक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यावर ध्यानात येते की, क्रिस इतर क्रिकेटर्ससोबत डान्सची मजा घेत आहे.

Updated: Apr 30, 2018, 02:58 PM IST
व्हिडिओ : ख्रिस गेलने केला 'तारे गिन-गिन'वर हटके डान्स title=

मुंबई : वेस्टइंडीजचा धडाकेबाज फलंदाज आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या ११व्या पर्वासाठी पंजाबकडून खेळत असलेला क्रिकेटर ख्रिस गेल सध्या भलताच चर्चेत आहे. गेल सध्या जोरदार फॉर्मात आहे. आयपीएलच्या झालेल्या चारही सामन्यात त्याने २५२ धावा चोपल्या आहेत. त्याच्या मैदानावरील या कामगिरीमुळे तो चर्चेत आहेच. पण, तो मैदानाबाहेरील कामगिरीमुळेही चर्चेत आहे. त्याने 'तारे गिन-गिन' गाण्यावर त्याने केलेला डान्समुळे सध्या भलताच चर्चेत आहे. समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) तो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

 

Universe Boss - Party Time 

A post shared by Indian Cricket Team  (@cricket.freak) on

ख्रिसचा डान्स पाहताच त्याची एनर्जी ध्यानात येते. अनेक लोकांनी त्याच्या हटके डान्सचे कौतुक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यावर ध्यानात येते की, ख्रिस इतर क्रिकेटर्ससोबत डान्सची मजा घेत आहे.