मुंबई : गेल्या आठवड्यात शनिवारी बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारचा अपघात झाला होत्या. या दुर्दैवी अपघातात त्या गंभीर जखमी देखील झाल्या होत्या. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर कोकिलाबेन रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना लवकरच आयसीयूमधून जनरल वॉडमध्ये हलवण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
मंगळवारी ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'माझं कुटुंब माझ्या सर्व मित्रपरिवाचे आणि शुभचिंतकांचे आभार मानत आहे. तुम्हाला सर्वांना माहित असायला हवयं की शबाना यांची तब्येत आता स्थिर आहे. त्यांना लवकरच जनरल वॉडमध्ये हलवण्यात येणार आहे.' अशी आनंदाची बातमी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.
Our family would like to thank all the friends and well wishers for their concern and messages for @AzmiShabana. This is to let everyone know that she is recovering well and most probably will be shifted to a normal room tomorrow.
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) January 22, 2020
अपघातामध्ये शबाना आझमींच्या डोळ्यांला आणि डोक्याला अधिक मार लागला होता. शबाना आझमींच्या अपघाताची बातमी कळताच बॉलिवूड मधील अनेक कलाकार त्यांच्या भेटीसाठी रूग्णालयात दाखल झाले. शबाना यांना पाहायला तब्बू, अनिल कपूर यांच्यासह अन्य सेलिब्रिटीही रुग्णालयात पोहोचले होते.
अपघातानंतर शबाना आझमी यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात शिफ्ट करण्यात आलं आहे. आता तिच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. आता शबाना आझमींची तब्बेत स्थिरावली असल्याचं सांगण्यात येत आहे.