फॅशन ट्रेंडच्या नादात जान्हवी फसली... चारचौघात घसरणारा ड्रेस घातला आणि नेमका तो...

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हळुहळू मनोरंजन विश्वात आपले स्थान निर्माण करत आहे. जान्हवी रोज कोणत्या ना कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसत असते आणि तिचे अनेक व्हिडिओ व्हायरलही होतात. जान्हवीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Updated: Feb 11, 2022, 11:52 AM IST
फॅशन ट्रेंडच्या नादात जान्हवी फसली... चारचौघात घसरणारा ड्रेस घातला आणि नेमका तो... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हळुहळू मनोरंजन विश्वात आपले स्थान निर्माण करत आहे. ही अभिनेत्री रोज कोणत्या ना कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसत असते आणि तिचे अनेक व्हिडिओ व्हायरलही होतात. जान्हवीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.(Janhavi kapoor viral video)

जान्हवीचा ड्रेस

जान्हवी कपूर तिच्या खास ड्रेसिंग स्टाइलसाठी ओळखली जाते, लोक तिची स्टाइल खूप फॉलो करतात. पण स्टायलिश असणं कधी कधी महागात पडतं. जेव्हा जान्हवी स्टार व्हर्सेस फूडमध्ये पोहोचली तेव्हाही असेच घडले. येथे अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा जंपसूट घातला होता जो स्किन टाईट होता, हास सूट तिच्या फिगरवरही खूप छान दिसत होता. पण या जंपसूटच्या डीप नेकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

ड्रेसमुळे जान्हवी हैराण

जान्हवी कपूरला स्टार व्हर्सेस फूड शोमध्ये स्वयंपाक करण्यासाठी जायचे होते आणि यावेळी तिने निवडलेल्या ड्रेसमध्ये ती खूपच अस्वस्थ दिसत होती. 
अभिनेत्रीचा ऑफ शोल्डर जंपसूट तिच्यासाठी अडचणीचा ठरला. तिच्या ड्रेसच्या डीप नेकमुळे ती हैराण होत होती. स्वयंपाक करताना ड्रेस आवरण्यातच तिचा बराच वेळ गेला.

जान्हवीचे आगामी चित्रपट

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच सिद्धार्थ सेन गुप्ता दिग्दर्शित 'गुड लक जेरी' या चित्रपटात दिसणार आहे. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे, चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय यांनी केली आहे. याशिवाय ती करण जोहरच्या 'दोस्ताना 2' या चित्रपटातही दिसणार आहे.