आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड सीनमुळं दीपिकाचा हा सिनेमा तुम्हाला पाहता येणार नाही, जर...

दीपिकाच्या सीनची का होतेय इतकी चर्चा?  

Updated: Feb 11, 2022, 11:23 AM IST
आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड सीनमुळं दीपिकाचा हा सिनेमा तुम्हाला पाहता येणार नाही, जर...  title=

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोणने 'ओम शांती ओम' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली. त्यानंतर दीपिकाने कधी मागे वळून पाहीलं नाही. प्रत्येक सिनेमात एका वेगळ्या भूमिकेतून दीपिका  चाहत्यांच्या भेटीस आली. बॉलिवूडमध्ये अनेक आव्हानात्मक भूमिका साकारत तिने चाहत्यांच्या मनात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं.

फक्त बॉलिवूड नाही हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी दीपिका आता 'गहराइया' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. 'गहराइया'  चित्रपटात दीपिकाचा अत्यंत बॉल्ड आणि हॉट अंदाज प्रेक्षकांचा अनुभवता येणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि सर्वत्र दीपिका आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीच्या बोल्ड सीनची चर्चा रंगली. आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड सीनमुळं दीपिकाचा हा चित्रपट तुम्हाला पाहता येणार नाही, जर तुमचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल.

सिनेमाला दिलेल्या अधिकृत कॉपीनुसार, एकही सीन कट न करता सिनेमाला हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. सिनेमाला ए सर्टिफिकेट प्रमाण देण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा आहे. 

'गहराइया' सिनेमा आजपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. सिनेमात दीपिका आणि सिद्धांत शिवाय आभिनेत्री अनन्या पांडे, अभिनेता धैर्य करवा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.