मीरा राजपूतच्या बेबी शॉवर पार्टीत जान्हवी कपूरची धडक

बॉलिवू़ड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा एका नव्या छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. 

Updated: Jul 17, 2018, 07:55 AM IST
मीरा राजपूतच्या बेबी शॉवर पार्टीत जान्हवी कपूरची धडक title=

मुंबई : बॉलिवू़ड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा एका नव्या छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. ही आनंदवार्ता काही दिवसांपूर्वी शाहिदने सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना दिली होती.

आता मीरा राजपूतच्या बेबी शॉवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मीरा राजपूतनी पती शाहिद कपूरसह केक कापला. या पार्टीला शाहिदचे वडील पंकज कपूर आणि आई नीलिमा अजीम देखील उपस्थित होते.

shahid kapoor mira rajput

या पार्टीला धडकची अभिनेत्री जान्हवी कपूर देखील उपस्थित होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जान्हवी पार्टीतून जात असताना शाहिदची आई नीलिमा तिला सोडायला बाहेरपर्यंत आली.

shahid kapoor mira rajput

ईशान खट्टर, शाहिदचा भाऊ आहे. त्यामुळे फॅमेली फंक्शनला जान्हवीने हजेरी लावल्यामुळे ईशान आणि जान्हवीच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.

shahid kapoor mira rajput

शाहिद व मीराला मीशा ही दोन वर्षांची मुलगी आहे. दिल्लीतील मीरा राजपूत आणि बॉलिवूडचा अभिनेता शाहिद कपूर हे २०१५ मध्ये विवाहबद्ध झाले.

shahid kapoor mira rajput

सध्या शाहिद कपूर बत्ती गुल मीटर चालू सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

shahid kapoor mira rajput