दुसऱ्या लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात माहिरा खान देणार Good News? 'त्या' पोस्टमुळे चर्चा

Mahira Khan Pregnant : माहिरा खान लवकरच देणार चाहत्यांना गूड न्यूज! त्या पोस्टमुळे रंगली चर्चा

दिक्षा पाटील | Updated: Feb 12, 2024, 10:36 AM IST
दुसऱ्या लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात माहिरा खान देणार Good News? 'त्या' पोस्टमुळे चर्चा title=
(Photo Credit : Social Media)

Mahira Khan Pregnant : पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ही शाहरुख खानच्या 'रईस' या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखली जाते. ऑक्टोबरमध्ये माहिरा तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. ऑक्टोबरमध्ये तिनं दुसरं लग्न केलं. माहिरानं सलीम करीमसोबत लगन केलं. आता लग्नाच्या तीन महिन्यांनंतर माहिरानं चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. ती लवकरच आई होणार असल्याची बातमी समोर आली आहे. 

'ईटाइम्स'च्या रिपोर्टनुसार, माहिरा खानविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की ती प्रेग्नंट आहे. असं देखील म्हटलं जातं आहे की ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात बाळाल जन्म देऊ शकते. मात्र, तिनं अजून यावर कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. माहिरानं सध्या तिच्या कामातून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याच कारणामुळे ती प्रोजेक्ट्सला नाही म्हणते असं म्हटलं जातंय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

माहिरा 2006 मध्ये लॉस एंजिल्समध्ये अली अस्कारीला भेटली होती. दोघं जवळपास एक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर 2007 मध्ये त्यांनी लग्न केलं. मात्र, माहिराचे वडील या लग्नाच्या विरोधात होते. त्यानंतर लग्नाच्या दोन वर्षात म्हणजे 2009 मध्ये माहिरा आणि अलीला एक मुलगा झाला. काही वर्षांत त्यांच्या वैवाहिक आयुष्यातली स्थिरता ही कमी होऊ लागली होती आणि 8 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. 

is mahira khan goiving to give good news to fans about her pregnancy

2 ऑक्टोबर 2023 रोजी माहिरानं सलीम करीम याच्यासोबत लग्न बंधनात अडकली. सलीम करीम विषयी बोलायचे झाले तर तो एक बिझनेसमॅन आहे. माहिरा आणि सलीम यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तर माहिराचा मुलगा हा आता 15 वर्षांचा आहे. 

हेही वाचा : 'तिच्या तोंडातून येणाऱ्या वासानं...', मनीषा कोइरालासोबतच्या रोमॅन्टिक सीनवर देओलचा खुलासा

माहिरा ही तिच्या खासगी आयुष्यासोबतच तिच्या कामामुळे देखील चर्चेत राहते. तर सोशल मीडियाच्या माध्यामातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. माहिराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान, माहिराच्या प्रेग्नंसीच्या चर्चां आणि वेगवेगळ्या पोस्ट पाहता नेटकऱ्यांनी आणि तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. तरी तिच्या चाहत्यांना आशा आहे की ही बातमी खरी असेल आणि लवकरच माहिरा या बातमीला दुजोरा देईल.