सेक्रेड गेम्स फेम अभिनेत्रीने हिजाबच्या निषेधार्थ कपडे काढून पोस्ट केला व्हिडिओ

 इराणमधील हिजाबविरोधी चळवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचली आहे. 

Updated: Oct 11, 2022, 11:11 PM IST
सेक्रेड गेम्स फेम अभिनेत्रीने हिजाबच्या निषेधार्थ कपडे काढून पोस्ट केला व्हिडिओ title=

मुंबई : इराणमधील हिजाबविरोधी चळवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचली आहे. विशेष म्हणजे या चळवळीचं नेतृत्व महिला करत आहेत. ज्यांना जगभरातील बड्या व्यक्तींचा पाठिंबा मिळत आहे. हिजाबविरोधातील निदर्शनांच्या समर्थनार्थ आवाज उठवणारी इराणी अभिनेत्री एलनाज नोरोझी पुन्हा एकदा आंदोलनात उतरली आहे.

तिने अनोख्या पद्धतीने आंदोलन केल्याने त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. मंगळवारी एलनाज नोरोजीने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये ती निषेध म्हणून तिचे कपडे काढताना दिसली.

व्हिडिओमध्ये इराणी अभिनेत्री तिचा हिजाब आणि बुरखा काढताना दिसत आहे. त्यानंतर ती तिचे सगळे कपडे काढते. याचबरोबर तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'प्रत्येक स्त्रीला, जगात कुठेही, ती कुठलीही असली तरीही, तिला हवं ते, केव्हा आणि कुठेही घालण्याचा अधिकार असला पाहिजे. कोणताही पुरुष किंवा इतर कोणत्याही स्त्रीला तिचा न्याय करण्याचा किंवा तिला इतर कपडे घालण्यास सांगण्याचा अधिकार नाही.'

'लोकशाही म्हणजे निर्णय घेण्याची शक्ती'
एलनाज नोरोजी हिने लिहिलं, 'प्रत्येकाचे स्वतःचे विचार आणि श्रद्धा असतात आणि त्यांचा आदर केला पाहिजे. लोकशाही म्हणजे निर्णय घेण्याची शक्ती. प्रत्येक स्त्रीला तिच्या शरीराबद्दल निर्णय घेण्याची शक्ती असली पाहिजे. मी नग्नतेला प्रोत्साहन देत नाही, मी 'तुमच्या आवडीच्या स्वातंत्र्याचं' समर्थन करत आहे. सप्टेंबरपासून सुरू असलेल्या आंदोलनात महिलाही केस कापताना आणि हिजाब जाळताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
इराणमधील प्रकरणाची सुरुवात सप्टेंबरमध्ये २२ वर्षीय महसा अमिनीच्या अटकेपासून झाली. नीट हिजाब न घातल्याने मॉरालिटी पोलिसांनी अमिनीला ताब्यात घेतलं. महसा अमिनी पोलिस स्टेशनमध्ये बेशुद्ध पडली आणि त्यानंतर तीन दिवसांनी तिचा मृत्यू झाला. अमिनीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असून तिच्यावर कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन झाले नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या घटनेनंतर इराणमधील अनेक शहरं, गावं आणि गावांमध्ये विरोध सुरू आहेत.