आलिया-रणबीर पाठोपाठ बॉलीवूडचे 'हे' कपल अडकणार लग्नबंधणात... या ठिकाणी घेणार सप्तपदी

'कॉफी विथ करण'मध्ये (Coffee with Karan) दोघांनीही आपापल्या मनात दडलेली स्वप्ने सांगितली. मोठ्या बिनधास्तपणे सर्वांसमोर ठेवली.

Updated: Oct 11, 2022, 10:11 PM IST
आलिया-रणबीर पाठोपाठ बॉलीवूडचे 'हे' कपल अडकणार लग्नबंधणात... या ठिकाणी घेणार सप्तपदी title=
After Alia Ranbir this Bollywood couple Sidharth Kiara will get married nz

Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) ​​आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) बी-टाउनमधील सर्वात चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक, त्यांच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे अनेकदा हेडलाइन देखील बनतात. 'शेरशाह' चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने जवळ आलेल्या या स्टार्सनी बरेच दिवस मीडिया आणि चाहत्यांच्या नजरेपासून आपले नाते लपवण्याचा प्रयत्न केला होता, तर काही काळापूर्वी 'कॉफी विथ करण'मध्ये (Coffee with Karan) दोघांनीही आपापल्या मनात दडलेली स्वप्ने सांगितली. मोठ्या बिनधास्तपणे सर्वांसमोर ठेवली.

या बातमीने दोघांचे चाहते खूप खूश आहेत आणि त्यांना सिद्धार्थ आणि कियाराला लवकरात लवकर लग्नबंधनात बघायचे आहे. चाहत्यांना जे हवे आहे त्यांच्यासाठी आमच्याकडे अशी आनंदाची बातमी आहे, जी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणेल. (After Alia Ranbir this Bollywood couple Sidharth Kiara will get married nz)

आणखी वाचा - या अभिनेत्याने पापाराझींसाठी गर्लफ्रेंडला सगळ्यांसमोर केली किस

 

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह' (SherShah) या सुपरहिट चित्रपटातील सुपरहिट जोडी सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी आजच्या काळात बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वात लोकप्रिय जोडी बनली आहे. दोघे अनेकदा सिक्रेट व्हॅकेशन (Secret Vacation) आणि डिनर डेट (dinner date) एन्जॉय करताना दिसतात. यापूर्वी अप्रत्यक्षपणे त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता सिद्धार्थ आणि कियाराच्या चाहत्यांना (Fans) दोघांनीही लवकरात लवकर लग्न करावे अशी ईच्छा आहे. अशा परिस्थितीत, सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. वास्तविक, काही रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की सिद्धार्थ आणि कियारा पुढच्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.

आणखी वाचा - Malaika Arora Video: चाहत्यांसाठी गोड बातमी, मलायका करतेय दुसऱ्या लग्नाची तयारी...

 

मीडिया (Media) रिपोर्ट्सनुसार, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​पुढील वर्षी एप्रिल महिन्यात दिल्लीत लग्न करणार आहेत. या स्टार जोडप्याने केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीतच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर, 'कियारा आणि सिद्धार्थ पुढच्या वर्षी लग्न (marriage) करणार आहेत. सिद्धार्थचे कुटुंब दिल्लीत (Delhi) असल्याने लग्नही तिथेच होणार आहे. दोघे आधी लग्नाची नोंदणी करतील आणि नंतर कॉकटेल पार्टी ठेवतील. यानंतर कियारा आणि अडवाणी यांचे ग्रँड रिसेप्शनही (Grand Reception) होऊ शकते.